आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद- बॉलिवडूमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी विशाल-शेखर यांच्यातील शेखरला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये 3 अंड्यांसाठी तब्बल 1 हाजर 672 रुपयांचे बिल आकारण्यात आले आहे. या घडलेल्या प्रकाराची माहिती शेखरने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दिली. तसेच त्याने बिलचा फोटोही शेअर करत कॅप्शन लिहीले, 'हे एक Eggxorbitant meal होतं.'
काही महिन्यांपूर्वीच अशीच एक घटना अभिनेता राहुल बोससोबत घडली होती. त्यावेळी त्याला एका एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दोन केळींसाठी 442 रुपयांचे बिल आकारले होते. अशीच घटना पुन्हा एकदा संगीतकार शेखर रवजियानीसोबत घडली. अहमदाबादमधील हयात रेजेन्सी हॉटेलमध्या हा सर्व प्रकार घडला आहे. याबाबत आता हॉटेल प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.