आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 दिवस फुटबाॅल टीम अडकलेल्या थायलंडच्या गुहेला बनवले पर्यटनस्थळ; शंभराहून जास्त दुकाने थाटली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक- उत्तर थायलंडमधील ज्या गुहेत  एक फुटबॉल टीम १७ दिवसांपर्यंत अडकून पडली हाेती, त्या जागेचे अाता पर्यटनस्थळात रूपांतर झाले अाहे. गत १६ नाेव्हेंबरला तेथील उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात अाले. त्यामुळे लाेक तेथे पर्यटनासाठी जात अाहेत. मात्र, सध्या या गुहेला पर्यटकांसाठी खुले केलेले नाही. चियांग राय भागात असलेल्या थेम लुआंग या गुहेच्या उद्यानात १०० हून जास्त दुकाने थाटण्यात अाली असून, तेथे फुटबॉल टीमचे स्मृतिचिन्ह टी-शर्ट व इतर वस्तू विकल्या जात अाहेत.

 

याच वर्षी जूनमध्ये थाई युवा फुटबॉल टीमचे १२ सदस्य या गुहेत अडकले हाेते. त्यांना थायलंडसह जगभरातील सुमारे 60 पाणबुड्यांनी वाचवले हाेते. टीम बचाव मिशनमध्ये जीव गमावणाऱ्या पाणबुड्याच्या स्मरणार्थ संग्रहालय या फुटबॉल टीमला वाचवण्याच्या माेहिमेत जीव गमावणारे पाणबुडे सामन गुआन यांच्या स्मरणार्थ  एक संग्रहालय बनवले जात अाहे. तसेच येणाऱ्या  पर्यटकांची राहण्याची साेय व्हावी म्हणून तेथील उद्यानात टेंट रिसॉर्टदेखील साकारले जात अाहे. 

 

ही अामच्यासाठी अभिमानाची बाब...
ही गुहा पाहण्यासाठी यापूर्वीही लाेक येत हाेते; परंतु फुटबाॅल टीमला गुहेतून सुरक्षित काढण्यात अाल्यानंतर हे स्थळ जगभरात अधिकच प्रसिद्ध झाले. त्यामुळे अनेक देशांचे नागरिक येथे येत अाहेत. ही अामच्यासाठी अभिमानाची बाब अाहे, असे उद्यानात स्टॉल लावणाऱ्या वीपाने सांगितले.  

 

बातम्या आणखी आहेत...