आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात कनकच्या शरीराचे झाले होते दोन तुकडे, 17 महिन्यांनी पुन्हा परतली ती, आई म्हणाली-माझ्या स्वप्नात येत होती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ - 17 महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक भीषण अपघात जाला होता. त्यात 14 वर्षांच्या कनक नावाच्या मुलीच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. तरीही त्यानंतर ती आईच्या मांडीवर डोके ठेवून आईशी बोलताना दिसली होती. कनकचे अखेरचे शब्द होते - आई, आय लव्ह यू. आता ती पुन्हा या जगात परतली आहे. कनकच्या कुटुंबामध्ये एका परीचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. या चिमुरडीच्या रुपात कनकच पुन्हा परतली असल्याची संपूर्ण कुटुंबाची भावना आहे. कुटुंबाने तिचे नाव ओम शक्ती ठेवले आहे. 


काय घडले होते, 17 महिन्यांपूर्वी 
- शास्त्री नगरचे राहणारे सराफा व्यापारी, सुभाष वर्मा यांची मुलगी कनकचा मृत्यू 25 मे 2017 रोजी घराजवळच एका अपघातात झाला होता. 
- 14 वर्षांची कनक एमपीजीएसमध्ये 10th वीची विद्यार्थिनी होती. 25 मे रोजी सुभाषचे वडील जगदीश वर्मा कनकला ट्युशनला नेण्यासाठी स्कुटीवर निघाले होते. 
- घरापासून काही अंतरावर एका ट्रकने स्कुटीला धडक दिली होती. कनकच्या शरीरावरून ट्रकचे चाक केले. या अपघातात जगदीश गंभीर जखमी झाले होते. तर कनकच्या शरीराचे अक्षरशः दोन तुकडे झाले होते. 
- शरीराचे दोन तुकडे झाल्यानंतरही कनक बराचवेळ तिच्या आईशी बोलत होती. त्यावेळी तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. 


वैष्णो देवीला केला होता नवस, स्वप्नात म्हणाली होती-मी येत आहे आई 
- कनकचे वडील सुभाष यांनी सांगितले की, अपघातानंतर काही दिवसांनी आम्ही वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. आम्ही त्याठिकाणी आम्हाला मुलगी व्हावी यासाठी नवस केला होता. 
- कनकचे वडील म्हणाले की, देवी त्यांच्या स्वप्नात आली होती आणि म्हणाली होती की नवरात्रीनंतर ती त्यांच्या घरी येईल. 
- रविवारी सायंकाळी कनकची आई राजेश वर्मा यांनी एका मुलीला जन्म दिला. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की, या मुलीच्या रुपाने कनक पुन्हा त्यांच्या कुटुंबात आली आहे. 
- राजेश म्हणाल्या की, त्यांची मुलगी कनक अनेकदा त्यांच्या स्वप्नात यायची. आईला समजावत ती म्हणायची, आई मी येत आहे. वडील सुभाष यांनाही कनक अनेकदा स्वप्नात दिसायची. 

 

बातम्या आणखी आहेत...