आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

 जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 17 नोव्हेंबरला पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे शुभ नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस उत्तम राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. रविवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

  • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ६

आज  मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. गृहीणी वाढत्या जबाबदाऱ्या हसतमुखाने स्विकारतील.

  • वृषभ: शुभ रंग : अबोली | अंक : ९

आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अती स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावतील. तुमची काही गुपिते उघड होऊ शकतील. 

  • मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८

पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर  तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. भावंडांमधे मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे. 

  • कर्क : शुभ रंग : निळा | अंक : ७

अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान राहतील. योग्य माणसे संपर्कात येतील. महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल. वाद नकोत.                                                                       

  • सिंह : शुभ रंग : क्रिम | अंक : ६

आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवायचा मोह होईल. गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लकही तपासा. 

  • कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठया लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. इच्छापूर्तीचा दिवस.

  • तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : १

व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित.

  • वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७

आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको. 

  • धनू : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५

हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चूकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. आज वैवाहीक जिवनांत जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.   

  • मकर : शुभ रंग : हिरवा | अंक : २

वैवाहीक जिवनांत असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटू शकणार आहेत. व्यवसायाच्या ठीकाणी भागिदारांशी सलोखा राहील. आनंदी दिवस.  

  • कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ४

नोकरदार मंडळी वरीष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालावे लागणार आहे. ज्येष्ठांना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत.       

  • मीन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ३

हौशी मंडळींना आज  जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमच्या कामातील उत्साह इतरांस प्रेरणा देईल. ज्येष्ठांना  प्रकृती स्वास्थ लाभेल. 

बातम्या आणखी आहेत...