आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किनगावात अतिसाराची लागण झालेले १७ रुग्ण जळगावात दाखल; २३ पथके कार्यान्वित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल-किनगाव (ता.यावल) येथे रविवारी अतिसार सदृश्य लागण झाल्याने २ जण दगावले, तर ४० जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. सोमवारी देखील १७ रुग्णांची तपासणी करत त्यांना जळगावला हलवण्यात आले. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर ह्या पथकासह गावात तळ ठोकून होत्या. आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी जि. प. सदस्य आर.जी.पाटील यांनी रुग्णालय गाठून मदत कार्याचा आढावा घेतला. 


किनगाव येथे रविवारी सकाळी अतिसार सदृश्य लागण झाली. त्यात प्रकृती खालावल्याने नाना माधव साळुंखे (वय ३८) आणि दिलीप गेंदा साळुंके (वय ५०) या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर रविवारी रात्री ९ वाजेला गावातील विशिष्ट दोन भागात इतरही नागरिकांना जुलाब व उलट्यांच्या त्रास सुरू झाला. अशा ४० रुग्णांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉ.अनिल पाटील, डॉ. विघ्नेश्वर नायर यांनी तातडीने उपचार सुरू केले. दरम्यान, धोका टाळण्यासाठी काही रुग्णांना रात्रीच जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. तेथे जि. प. सदस्या अरुणा रामदास पाटील, आर. जी. पाटील हे मदतीसाठी सरसावले. गावात पं. स.चे उपसभापती उमाकांत पाटील, सरपंच भूषण पाटील, शरद अडकमोल, सुरेश सोनवणे, प्रशांत पाटील, गोपाल चौधरी, अनिल पाटील यांनी आरोग्य केंद्रात मदतकार्यात हातभार लावला. सोमवारी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी सोमवारी किनगाव गाठून आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेतला. 


पथके कार्यान्वित 
साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्हास्तरीय २३ पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यापैकी ८ डॉक्टरांचे पथक आरोग्य केंद्रात सेवा देत आहे. तर ४३ आरोग्यसेवक, ४३ आशा वर्कर्स ४३ यांची पथके गावात घरोघरी तपासणी करत पाण्यात क्लोरिन टाकून ते उकळून व गाळून पिण्याचा सल्ला देत आहेत. डॉक्टरांचे पथक सर्वेक्षण-उपचार करत असून पाण्याचे नमुने तपासणीस पाठवले. 

बातम्या आणखी आहेत...