Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

साप्ताहिक राशिफळ : 17 ते 23 जूनपर्यंतचा काळ काहीसा असा राहील तुमच्यासाठी 

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 18, 2019, 12:05 AM IST

साप्ताहिक राशिफळ : 17 ते 23 जूनपर्यंत 6 राशींसाठी ठीक नाही ग्रहस्थिती, नुकसान होण्याचे योग आणि वाढतील अडचणी

 • Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

  आठवडा 17 ते 23 जून दरम्यान मिथुन राशीमध्ये 4 ग्रह राहतील. चंद्रावर राहू-केतू आणि शनीची अशुभ छाया राहील. ग्रह-ताऱ्यांची ही स्थिती मेष, कर्क, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करू शकते. धनहानी आणि नुकसान होऊ शकते. या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहारामध्ये सावध राहून काम करावे. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची मदत मिळेल. सहा राशीच्या लोकांची ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.


  मेष
  कामाची गती कमी हाेईल. उत्पन्नात अडचणी निर्माण हाेतील. साेमवारी संध्याकाळी भाग्य अनुकूल हाेईल आणि वेळेनुसार काम करू शकाल. मंगळवार आणि बुधवारी समस्या सुटतील आणि उत्पन्नात सुधारणा हाेईल. गुरुवारपासून आठवड्याच्या शेवटपर्यंत अचानक लाभ हाेण्याचा याेग आहे.


  व्यवसाय : महत्त्वाची कामे व गुंतवणूक बुधवारनंतर करा
  शिक्षण : माेठे यश मिळेल. प्रयाेग यशस्वी हाेतील. लक्ष्यप्राप्ती हाेईल
  आरोग्य : अनिद्रा, डाव्या डाेळ्यात दुखण्याचा त्रास
  प्रेम : प्रेम तुमच्या बाजूने असेल. भिन्न लिंगाबद्दलआकर्षण वाटेल
  व्रत : महालक्ष्मीची पूजा करा, काही राेख दान करा.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...

 • Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

  मकर 
  एकादश चंद्र लाभ स्थिती कायम राखेल .सप्ताहाच्या मध्यात ताे द्वादश हाेईल. मेहनत आणि संघर्षाची स्थिती निर्माण हाेईल. कामात विलंब हाेईल. सतर्कता राखावी. वादाची प्रकरणात स्वत:ला सांभाळा. माैल्यवान वस्तू सांभाळा. 


  व्यवसाय : वरिष्ठांशी जमवून घ्या. वादविवाद टाळा . 
  शिक्षण : मदतीची अपेक्षा नकाे.स्वत:च्या मेहनतीवर भर द्या. 
  आरोग्य : पायाला जखम. दात दु:खी. वाहनापासून सांभाळा 
  प्रेम : साथीदाराकडून दु:ख मिळू शकते. वैवाहिक सुख कमी मिळेल. 
  व्रत : शिवलिंगावर साेमवारी ३ बिल्वपत्ो वाहा. 

 • Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

  कुंभ 
  राशी स्वामी शनीची दृष्टी आहे. कामाला वेग येईल, काम अधिक राहील. कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. मंगळवारी आणि बुधवारी उत्पन्नात वाढ हाेईल. अडचणी संपतील. अपत्त्यांकडून सुख आणि सगळीकडून यश मिळेल. 


  व्यवसाय : गुंतवणूक व नवे व्यवहार सुरुवातीला लाभ देतील. नाेकरीत प्रगती हाेईल. 
  शिक्षण : बाैध्दिक पातळीवर सुधारणा. प्रतिकूल स्थिती संपेल. 
  आरोग्य : जुनाट आजारापासून आराम. मानसिक आराम मिळेल. 
  प्रेम : प्रेमात नवी अनुभूती मिळेल. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. 
  व्रत : शिवलिंगावर वस्त्र अर्पण व गुरुची पूजा करा.

 • Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

  वृश्चिक 
  गुरु- चंद्राची युती राशीत राजयाेग निर्माण करत आहे. शुक्राच्या दृष्टीमुळे धन लाभाची शक्यता आहे. अडकलेली कामे सुटण्यात गती येईल. जमिनीतून लाभ हाेईल. नातेवाइकांचे सहकार्य मिळेल. शनिवारी सकाळी सतर्क राहावे लागेल. निष्ठेवर प्रश्न निर्माण हाेऊ शकतात. 


  व्यवसाय : नाेकरीत सावध रहा. वरिष्ठांना नाराज करू नका 
  शिक्षण : पध्दत बदलावी लागेल आणि नव्या प्रकारे याेजना आखा. 
  आरोग्य : सर्दी पडशाचा त्रास हाेईल. कमजाेरी वाटेल. 
  प्रेम : साथीदारापासून दूर राहावे लागेल. 
  व्रत : गुरू किंवा शिवाची सेवा करा. केळी दान करा.

 • Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

  धनू 
  अडचणींनी आठवड्याचा प्रारंभ हाेईल. कर्जामध्ये अडचणी येऊ शकतात. बुधवारी आणि गुरुवारी वेळेत कामे हाेतील व उत्पन्न वाढेल. काैटुंबिक समस्या मिटतील. आठवड्यात यात्रा सफल हाेतील. नवीन लाेकांशी परिचय लाभदायक ठरेल. 


  व्यवसाय : कार्यस्थळी वाद हाेतील. वरिष्ठांना नकार देताना कचरू नका 
  शिक्षण : सुखद परिणाम प्राप्त हाेतील. संशाेधन विषयात रुची 
  आरोग्य : गॅसेस व पाेटाच्या समस्या. पित्त वाढण्याची शक्यता 
  प्रेम : विवाह याेग्य प्रस्ताव येऊन स्थळ पक्के हाेऊ शकते. 
  व्रत : राधा- कृष्णाचे दर्शन घ्या, दह्याचा नैवेद्य दाखवा.

 • Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

  मिथुन 
  समस्यांचा अंत हाेणार आहे आणि बऱ्याच काळापासून रखडलेली कामे वेगाने पूर्ण हाेतील. आवडते काम करण्याची संधी मिळेल व त्यात यश मिळेल. मंगळवार, बुधवार चांगला दिवस असेल. गुरुवार आणि शुक्रवारी संभाळून राहा. शनिवारी चांगली बातमी एेकायला मिळेल. 


  व्यवसाय : व्यापारात प्रगती हाेईल. नाेकरदारांसाठी लाभ 
  शिक्षण : मेहनत केल्यास आवडते परिणाम दिसून येतील. 
  आरोग्य : प्रकृती सुधारेल. दातदुखीतून आराम मिळेल. 
  प्रेम : विरह समाप्त हाेईल, वैवाहक जीवन सुखी राहील. 
  व्रत : गुरूची सेवा करा, नसेल तर शिवलिंगाची पूजा करा.

 • Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

  तूळ 
  अनुकूल वेळ आहे. आर्थिक समस्या सुटतील. स्थायी संपत्तीतून लाभ मिळेल. भावांची मदत मिळेल. स्वपराक्रमातून कार्य यशस्वी कराल. उत्पन्न चांगले मिळेल. गुरुवार, शुक्रवारी वाहनसंबंधी समस्या हाेतील. अनावश्यक खर्च वाढेल. शनिवार सकाळपासून काळ अनुकूल आहे. 


  व्यवसाय : उत्कृष्ट कामासाठी सन्मान मिळू शकताे. 
  शिक्षण : चांगल्या संधी मिळतील. वेळेचा सदुपयाेग करा 
  आरोग्य : आत्मविश्वास वाढेल. चिंता मिटतील. जुने राेग बरे हाेतील 
  प्रेम : बाेलण्याचा चुकीचा अर्थ काढून साथीदाराशी वाद निर्माण हाेऊ शकताे. 
  व्रत : गणपतीला बेसनाच्या लाडूचा नैवद्य दाखवा. 

 • Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

  कन्या 
  शनी- मंगळाची दृष्टी आहे. साेमवारी संध्याकाळपर्यंत सर्व गाेष्टी ठीक हाेतील. परंतु बुधवार संध्याकाळपर्यंत समस्या निर्माण करणारी वेळ येऊ शकते. अडचणी येतील व मदत करणारे मागे हटतील. उत्पन्नावर परिणाम हाेईल. गुरुवारी सकाळी दिलासा मिळेल. संपर्क वाढेल. 


  व्यवसाय : अंतर्गत प्रकरणावर बाहेर चर्चा करू नका. सतर्क राहा 
  शिक्षण : खाेड्यांमध्ये रस घ्याल. वेळेनुसार अभ्यास करा 
  आरोग्य : मुलांची चिंता वाटेल, नसांमध्ये रक्ताची समस्या हाेईल 
  प्रेम : मनासारखा साथीदार मिळण्यात अडचण हाेईल. 
  व्रत : हनुमानासमाेर पिठाचा दिवा लावा. 

 • Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

  वृषभ 
  राशी स्वामी शुक्राचे गाेचर आहे. उत्पन्नात वाढ हाेईल. कामात सुधारणा हाेऊन मदत मिळेल. अपत्त्यांकडून सुख मिळेल. मंगळवार आणि बुधवारी अकारण मन उदास हाेईल. कमी लाभ हाेईल व चिंता राहील. गुरुवारपासून स्थिती तुमच्या बाजूने हाेईल. गुरुची दृष्टी असल्याने चांगले माेठे कार्य हाेण्याची शक्यता. 
   

  व्यवसाय : बाैद्धिक क्षेत्रात काम करण्यासाठी चांगला कालावधी 
  शिक्षण : परिणाम तुमच्या बाजुने करण्याच्या क्षमतांचा विकास हाेईल. 
  आरोग्य : डोकेदुखीही होऊन मानसिक थकवा जाणवू शकताे 
  प्रेम : प्रेमात नीरसता वाटेल. अध्यात्मात रची वाढेल 
  व्रत : गणपतीला दूर्वा, सूर्याला अर्घ्य द्या.

 • Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

  मीन 
  गुरूची दृष्टी आहे. भाग्य साथ देईल. कुटुंबाकडून सूख व सहकार्य मिळेल. उत्पन्नाच्यादृष्टीने श्रेष्ठ कालावधी आहे. अडकलेल्या पैशाची प्राप्ती हाेईल. याेजना यशस्वी हाेतील. नवीन लाेकांशी संपर्क लाभदायक ठरेल. 


  व्यवसाय : स्वत:वर विश्वास ठेवा. वरिष्ठांचा आदर राखा 
  शिक्षण : उच्च शिक्षित व्यक्तींना अडचणी येतील. बुधवारनंतर स्थिती याेग्य हाेईल 
  आरोग्य : त्वचा विकार संभावतात. आंबट खाऊ नका. 
  प्रेम : प्रेमात अपयश मिळू शकते. निराशेचा त्याग करा. 
  व्रत : पुस्तक आणि पेन दान करा. 

 • Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

  सिंह 
  आज आणि उद्या समस्या राहू शकतात. मंगळवारी सकाळचा वेळ पराक्रम दाखवेल. भावांकडून सहकार्य मिळेल व भाग्याची साथ मिळेल. चंद्र आर्थिक स्थिती भक्कम करेल. दूरची यात्रा करण्याची शक्यता. दूरच्या नातेवाइकांकडून चिंताजनक बातमी मिळण्याची शक्यता 


  व्यवसाय : कर्मचाऱ्यांवर नजर ठेवा. विराेधकांपासून सावध राहा. 
  शिक्षण : व्यावहारिक शिक्षणात लक्ष्य साधण्यात यशस्वी व्हाल 
  आरोग्य : रक्तदाबाची समस्या तसेच हाडांना जखमेची भिती 
  प्रेम : वैवाहिक जीवनात तणाव निर्माण हाेण्याची शक्यता आहे. 
  व्रत : मसुरीची डाळ खा. बैलाला गूळ खायला द्या. 

 • Weekly Horoscope 17 to 23 june 2019 in marathi

  कर्क 
  कामाच्या ठिकाणी लाभ हाेईल. मुलांकडून सुख मिळेल आणि सर्व कार्यात यश मिळेल. कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याची इच्छा हाेईल. याेजना सफल हाेतील. मंगळवार, बुधवारी उदास वाटेल. बेपर्वाईमुळे नुकसान हाेईल. गुरू व शुक्र तुमच्या पक्षात असतील. 


  व्यवसाय : कामाप्रती समर्पणाची भावना ठेवा . खर्च कपात करा. 
  शिक्षण : संशाेधनाच्या कार्यात यशाचे फळ तुमच्या बाजूने असेल 
  आरोग्य : स्वप्रयत्न, मनाेबल वाढवून राेगावर नियंत्रण मिळवाल 
  प्रेम : इतरांना प्रभावित कराल. विवाहाचे प्रस्ताव येतील. 
  व्रत : नारायण दर्शन करा आणि अर्घ्य द्या.

Trending