आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वय 17, उंची 3 फूट अन् वजन फक्त 14 किलो; MBBS अॅडमिशनसाठी गेला- पाहताच कमिटी म्हणाली, तू डॉक्टर बनण्याच्या लायक नाहीस!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावनगर (गुजरात) - ही जगातील दुर्मिळात दुर्मिळ घटना ठरेल, अवघा 3 फूट उंचीचा आणि 14 किलो वजन असणारा 17 वर्षीय गणेश एक डॉक्टर म्हणून समोर येईल. गणेशचे हे स्वप्न सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानंतर पूर्ण झाले. यापूर्वी गणेश जेव्हा MBBS अॅडमिशन गेला होता, तेव्हा कमिटीने त्याची उंची पाहून प्रश्न केला होता की- तुझी उंची एवढी कमी आहे, तू ऑपरेशन करू शकशील? मग प्रवेश द्यायला नकार दिला होता.

 

NEET मध्ये 233 स्कोअर
- भावनगर जिल्ह्यातील गणेश बारैया एका व्यंगासह जन्मला. गरीब कुटुंबात वाढलेला गणेश 6 बहिणींचा एकमेव भाऊ आहे. 
- लहानपणापासून त्याचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे. त्याने NEET मध्येही उत्तम कामगिरी करत 233 गुण मिळवले. परंतु अॅडमिशन कमिटीने त्याला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला नाही.
- कमिटीने तर्क दिला की, तुझी हाइट आणि वजह खूपच कमी आहे. एवढेच नाही, त्याला 72% अपंगसुद्धा मानले. म्हणाले- तू इमर्जन्सी केसमध्ये ऑपरेशन करू शकणार नाहीस. यामुळे या शिक्षणासाठी अयोग्य आहेस.

 

हिंमत नाही हरला, हायकोर्टात गेला
- गणेशचे आईवडील शेतात मजुरी करतात. त्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा काळात गणेशचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नीलकंठ विद्यापीठ तडाजाचे संचालक दलपतभाई कातरिया आणि रैवतसिंह सरवैया यांनी त्याची साथ दिली.
- गणेशला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. परंतु येथेही दुर्भाग्याने त्याची पाठ सोडली नाही. हायकोर्टाने त्याच्याविरुद्ध निकाल दिला. यामुळे गणेशचे स्वप्न भंग झाले.

 

मग सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका
- हायकोर्टात गेल्यावर कळले की, गणेशप्रमाणेच आधीही दोन मुले येऊन गेलेली आहेत, जे केस हरले होते. या संघर्षात आता तिघेही एकत्र आले. त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.
- या वेळी निकाल त्यांच्या बाजूने आला. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्द करत म्हटले, एखाद्या विद्यार्थ्याची उंची आणि वजन कमी असले,  तरीही त्याला त्याचे करिअर घडवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos..  

 

बातम्या आणखी आहेत...