आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ डे पार्टीत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग; पाेलिस उपमहानिरीक्षकावर गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीत एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नवी मुंबईतील तळाेजा पाेलिस ठाण्यात आयपीएस अधिकारी निशिकांत माेरे या पाेलिस उपमहानिरीक्षकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या माेरे पुण्यात कार्यरत आहेत. बाललैंगिक अत्याचारविराेधी कायदा व विनयभंगाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्यादीत म्हटले आहे, माेरे व मुलीचे वडील मित्र आहेत. ५ जून राेजी या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत माेरे अचानक आला व त्याने दारूची मागणी केली. मुलीच्या नातलगांनी केक कापून तिच्या चेहऱ्याला लावला, त्यावेळी माेरेने या मुलीशी लगट करून तिच्या चेहऱ्यावर लावलेला केक बाेटाने काढून दाेन-तीन वेळा चाटला. हा प्रकार काही जणांनी माेबाइलवर शूटही केला. हा प्रकार माेरेच्या लक्षात आल्यानंतर त्याने हा व्हिडिओ डिलिट करण्यास सांगितले, मात्र त्यांनी ऐकले नाही. माेरेविराेधात गेल्या सहा महिन्यांपासून तक्रार दाखल करण्यासाठी हे कुटुंबीय पाेलिस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र त्यांना दाद मिळत नव्हती. अखेर गुरुवारी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. व्हिडिओ क्लिपिंगच्या आधारे माेरेविराेधात गुन्हा दाखल केला.