आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षीय मुलीवर बाप अन् त्याचे मित्र करत होते रेप, 7 महिन्यांची प्रेग्नंट झाली तेव्हा झाला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब - पंजाबमध्ये एका 17 वर्षीय मुलीवर कथितरीत्या बाप आणि त्याच्या मित्रांनी अनेक वेळा बलात्कार केला. वृत्तसंस्थेनुसार, शुक्रवारी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिव्हिल लाइन्स पोलिसांचे एसएचओ भरत भूषण म्हणाले की, तरुणी 7 महिन्यांची प्रेग्नंट आहे.

 

असे आहे प्रकरण...
ही घटना पंजाबच्या रूपनगरमधील एका गावातील आहे. पीडिता आपल्या वडिलांसोबत राहत होती. ती प्रेग्नंट झाल्यानंतर एका महिला संघटनेने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी मुलीची मेडिकल टेस्ट केली. पोलिस म्हणाले की, घटनेची चौकशी सुरू आहे आणि आरोपींच्या अटकेसाठी छापे टाकले जात आहेत. 

 

काय म्हणतो कायदा?
पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो अॅक्ट आणि भादंवि कलम 376 (रेप) सहित इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत रेपप्रकरणी दोषी आढळल्यास सात वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते.  

 

 

बातम्या आणखी आहेत...