आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षीय मुलीने केली विमानाची चोरी, उडवण्याच्या प्रयत्नात भिंतीवर धडकवले; पोलिसांनी केली अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील कॅलिफोर्नियात एका 17 वर्षीय मुलीने विमार चोरण्याचा प्रयत्न केला. ती लपून विमानतळावर गेली आणि लहान विमान उडवून फरार होण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिच्या हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि विमान भिंतीवर धडकवले. सदरील घटना फ्रेस्नो योशिमाइट आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे. विमानतळ पोलिस प्रमुख ड्यू बेसिन्गर यांनी सांगितले की, मुलीने विमानाचे इंजिन चालू केले आणि साखळ्यांनी तयार केलेल्या कुंपणावर धडकली. मुलगी सैन्याच्या भागापासून सुमारे 400 मीटर अंतरावर असलेल्या कुंपणाद्वारे घुसली होती. विमान चोरीच्या संशयावरून मुलीला अटक करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...