आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 17 Years Ago An Abducted Prisoner Was Caught With The Help Of A Drone, Living In A Forest Cave

17 वर्षांपूर्वी फरार झालेला कैद्याला ड्रोनच्या मदतीने पकडले, जंगलातील एका गुफेत राहत होता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनच्या योंगशान पोलिसांनी मागील 17 वर्षांपासून फरार असलेल्या एका कैद्याला ड्रोनच्या मदतीने शोधून काढले. मागील महिन्यात पोलिसांनी 63 वर्षीय फरार कैदी सोंग जियांग युन्नानच्या जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या या माहितीवरुन शोध सुरू केला, पण यश मिळाले नाही. त्यानंतर पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने त्याला शोधले आणि त्यांना यश आले.कैदी सोंग जंगलातील एका गुफेत राहत होता. तो इतके वर्षे कोणाच्याच संपर्कात नव्हता. पोलिसांना जेव्हा तो सापडला, तेव्हा तो अनेक दिवसांपासून अंघोळ केलेलाही नव्हता. 17 वर्षात त्याच्या चेहऱ्यातही बदल झाला होता.

ह्यूमन ट्रॅफिक प्रकरणात शिक्षा झाली होती
सोंगला महिला आणि मुलांची तस्करी केल्याच्या प्रकरणात शिक्षा झाली होती. पण तो 2002 तुरुंगातून पळून गेला होता. तेव्हापासून त्याचा काहीच पत्ता लागला नाही. आता इतक्या वर्षानंतर त्याला पोलिसांनी परत पकडले.

बातम्या आणखी आहेत...