आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 Years Of 9/11 Attack : अमेरिकेवरील या हल्ल्याने हादरले होते संपूर्ण जग, आजही ताज्या आहेत जखमा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2001 मध्ये अमेरिकेवर करण्यात आलेल्या 9/11 हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. अल कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर, पँटॉगॉन आणि पेनिसिल्व्हेनियामध्ये एकाच वेळी मोठे दहशतवादी हल्ले घडवले होते. दहशतवाद्यांनी चार पॅसेंजर एअरक्राफ्टचे अपहरण केले होते. त्यापैकी दोन प्रवासी विमाने दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टॉवरमध्ये घुसवली. तर तिस-या विमानाने पेंटागॉनवर हल्ला केला. तर चौथे विमान पेनिसिल्व्हेनियामध्ये क्रॅश झाले होते. या हल्ल्यामध्ये 400 पोलिस अधिकारी आणि फायर फायटर्ससह 2983 जणांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये 57 देशांच्या नागरिकांचा समावेश होता. अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा यामागे हात होता. हल्ल्याचा बदला घेत अमेरिकेने 2 मे 2011 रोजी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये ओसामाचा खात्मा केला होता.

 

11 सप्टेंबर 2001 सकाळी 8 वाजून 19 मिनिटे झाली होती. लोक आपल्या घरातून कामाच्या ठिकाणी निघाले होते. त्याच वेळी न्यूयॉर्कच्या आकाशातून उडणारे फ्लाइट-11 मध्‍ये अजब हालचाल झाली. या विमानात 92 लोक प्रवास करत होते. आपल्या आयुष्‍याचे आता काही खरे नाही याबाबत ते अनभिज्ञ होते. अल कायदाच्या कटाचे ते शिकार होणार होते. आणि अमेरिका ही घटना कधीच विसरणार नव्हती. हल्ल्याच्या वेळी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्‍ये जवळपास 18 हजार कर्मचारी काम करत होते.


पुढील स्लाइड्सवर पाहा, 9/11 हल्ल्याची विदारकता दाखवणारे PHOTOS

बातम्या आणखी आहेत...