आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 17 Years Old Girl R Aping By Two Boys Continuously For 6 Months In Punjab

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संतापजनक: 2 नराधमांनी एका तरुणीला 6 महिने अंधाऱ्या खोलीत दोरखंडाने ठेवले बांधून, रोज करत होते रेप; तब्येत बिघडताच तिला मंदिराबाहेर फेकून पसार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिल्लौर (पंजाब) - 6 महिन्यांपूर्वी घराबाहेरून 17 वर्षीय मुलीला उचलून नेलेल्या दोन तरुणांनी तिला 6 महिने अंधाऱ्या खोलीत दोरखंडाने बांधून ठेवले. दोघेही तिच्यावर दररोज अत्याचार करत राहिले. मुलीची तब्येत जास्तच बिघडल्यावर तिला नकोदरच्या धार्मिक स्थळाबाहेर फेकून पसार झाले. मुलीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. सरकारी रुग्णालयात  शनिवारी मुलीच्या आईने सांगितले की, मुलीचा बाप रिक्षा चालवतो. त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी 6 महिन्यांपासून बेपत्ता होती, त्याची फिल्लोर पोलिसांत तक्रारही दिलेली होती.

अॅडिशनल एसएचओ कुलवंत सिंह म्हणाले की, मुलगी 6 महिन्यांपूर्वी बेपत्ता झाली होती. तेव्हापासून पोलिस तिचा शोध घेत होते. सध्या डॉक्टरांच्या मतानुसार मुलगी जबाब देण्याच्या स्थितीत नाही. तिचे जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.


अंधाऱ्या खोलीत दोरखंडाने बांधून ठेवायचे...
सरकारी रुग्णालयात दाखल पीडित मुलगी म्हणाली की, 6 महिन्यांपूर्वी दोन जण स्कूटरवरून तिच्या घराबाहेर आले. त्या वेळी तिचे आईवडील कामावर, तर छोटी बहीण शाळेत गेली होती. दोघे जण तिला काय बोलून सोबत घेऊन गेले, हे आतापर्यंत समोर आलेले नाही. तिला फक्त एवढेच आठवते की, तिला एका अंधाऱ्या खोलीत दोरखंडाने बांधून ठेवलेले होते, एक वेळ जेवण द्यायचे आणि दररोज बलात्कार करायचे. त्यांच्या कैदेतून सुटल्यानंतर शनिवारी पहिल्यांदा तिने सूर्यप्रकाश पाहिला.


दर्शनासाठी आलेले गावातील कुटुंबाने ओळखले...
पीडितेची आई म्हणाली की, मुलगी त्यांना 6 महिन्यांनी आढळली आहे. ती गायब झाल्याची तक्रार फिल्लौर पोलिसांनाही देण्यात आली होती. खूप शोधाशोध घेऊनही जेव्हा मुलगी आढळली नाही तेव्हा त्यांनी आशाच सोडून दिली होती. आता मुलीची प्रकृती खूप खराब आहे. आरोपींनी जेव्हा तिची तब्येत बिघडल्याचे पाहिले, तेव्हा तिला नकोदरच्या धार्मिक स्थळाबाहेर फेकून पसार झाले. तेथे गावातील एक कुटुंब दर्शनासाठी गेलेले होते. त्यांनी मुलीला ओळखले आणि सरपंचांना फोन लावला. मग त्यांनी आम्हाला माहिती दिली.