Home | National | Other State | 17 years old student rohan commits suicide

जेईई-मेन्सची टेस्ट देणाऱ्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, मेडिसिनच्या पावतीवर लिहीले- I quit, I am sorry

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 04:15 PM IST

वडील म्हणाले- तू तर इंजीनिअर बनून आपले स्वप्न पूर्ण करणार होतास, पण सॉरी म्हणून का असे केलेस

 • 17 years old student rohan commits suicide

  अमृतसर(पंजाब)- मोहिंदरा कॉलोनीमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय रोहनने रविवारी इंटरनेटवर आपली आन्सर की पाहिली होती. त्यात त्याचे कमी नंबर पाहून त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीयदेखील थोडे नाराज झाले. नाराज असूनही रविवारी रोहनने बाहेरून कुटुंबासाठी जेवण आणले. सोमवारी सकाळी 7:45 वाजता सरांना भेटायला जात आहे असे सांगून निघाला. रोहन बेदी कॉलेज ऑफ फिजिक्सचे प्रो. रोहित बेदीकडे ट्यूशन घेत होता. प्रो. बेदींनी सांगितले की, सोमवारी रोहन त्यांच्याकडे आलाच नाही.


  सकाळी 12 वाजता रोहनच्या आईने कॉल करून विचारले की, रोहन त्यांच्याकडे आलाच नाही. त्यानंतर प्रो. बेदी आणि रोहनच्या पेरेंट्सनी त्याची शोधाशोध सुरू केली. सोमवारी संध्याकाळी 6 सगळीकडे शोधल्यावरही रोहन मिळाला नाही. रात्री 8 वाजता वादळ आल्याने सगळ्यांना चिंता वाटू लागली. सोमवारी रात्री 11:30 वाजता रोहनची स्कूटी व्यास तलावाजवळ मिळाली. तिथे त्याची बॅग आणि सुसाइड नोट मिळाली.


  काय होते आन्सर कीमध्ये
  रोहन(17 वर्षे)ने 9 एप्रिलला जेईई-मेन्सची परीक्षा दीली होती. आयआयटीमध्ये अॅडमिशन घेण्याचे टारगेट त्याचे होते. जानेवारी-2019 पहिल्या टप्प्यातील परीक्षा दिली आणि त्याचे 150 प्लस नंबर आले. 14 एप्रिलला परीक्षेची आन्सरकी इंटरनेटवर अपलोड झाल्यावर त्याने आपली उत्तर तपासून पाहीली, यावेळी त्याचे 130 प्लस नंबर येत होते.


  आन्सर की मिळाल्यानंतर रोहन आणि त्याचे आई-वडील थोडे निराश झाले. त्याने त्याचे निराशेचे कारण सुसाइड नोटमध्ये लिहीले. त्याने त्यात लिहीले आय क्विट...आय अॅम सॉरी. पम जेईई-मेन्सच्या नंबरनुसार रोहन जेईई-अॅडवांससाठी क्वालिफाय करू शकत होता. रिझल्ट येण्यासाठी 20 ते 25 दिवस बाकी होते आणि त्याच्या वडिलांनी दुसऱ्या कॉलेजला अॅडमिशनची तयारी केली होती. पण त्यापूर्वीच रोहनने आपल जीवण यात्रा संपवली.

Trending