आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन- शास्त्रज्ञ म्यूऑन रेडियोग्राफीच्या मदतीने रशियातील डर्बेंट शहराजवळील कॅस्पियन सागरात रहस्यमयी इमारतीला स्कॅन करत आहेत. त्यांया दावा आहे की, ही इमारत सर्वात जुने चर्च आहे. तर काही लोकांचे म्हणने आहे की, हे एक जलाशय किंवा एक जोरास्ट्रियन फायर मंदिर आहे.
इमारत स्थानीक शेल चूना दगडांपासून बनली आहे
शोधकर्त्यांनुसार, जर हे चर्च असल्याचे सिद्ध झाले, तर हे जगातील सर्वात प्राचीन चर्चपैकी एक असेल. ही इमारत मध्ययुगीन नार्यन-कला किल्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला आहे.
ही इमारत पूर्णपणे भूमिगत आणि स्थानीक शेल चूना दगडांपासून तयार झालेली आहे. ही इमारत अंदाजे 1700 वर्षे जुनी आहे. पण हे उत्खनन कार्य सुरू केल्यास यूनेस्कोची ही साइट अडचणीत येऊ शकते.
रशियातील अकॅडमी ऑफ सायंसेजचे शोधकर्ते, स्कोबेल्त्सिन इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स लोमोनोसोव मॉस्को स्टेट यूनिव्हर्सिटी आणि डागेस्टॅन स्टेट यूनिव्हर्सिटीने याची प्रतिकृती बनवण्यासाठी बगैर-इनवेसिव तंत्रज्ञान म्यूऑन रेडियोग्राफीचा उपयोग केला.
पुरातत्व खात्यातील अधिकाऱ्यांच्या विविध निष्कषांमधून कळते की, इमारत एक क्रॉसच्या आकारात आहे. त्यामुळेच हे एक चर्च असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इमारतीची उंची 36 फूट, लांबी 50 फूट आणि रुंदी 44 फूट आहे.
शास्त्रज्ञांच्या टीमच्या प्रमुख नतालिया पोलुखिना यांचे म्हणने आहे की, ही एक आयाताकृती इमारत आहे. याची बनावट पाहून हे एक पाण्याचा टँक असण्याचीही शक्यता आहे. सध्या आमच्याकडे पक्की माहिती नसली तरी, आम्ही तपास करत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.