आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कार कंपनीची चलाखी तिच्यावरच पडली महागात, भारतात लागला 171 कोटी रूपयांचा दंड...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलच्या चार सदस्यीय समितीने जर्मन कार मेकर कंपनी Volkswagen वर 171. 34 कोटींचा दंड लावला आहे. कंपनीवर वायु प्रदूषण एककांच्या उल्लंघनाचे आरोप आहेत. एनजीटीनुसार कंपनीच्या कार मधून उत्सर्जित नायट्रोजन ऑक्साइडच्या जास्ती मात्रेमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम पडत आहे. एका एक्सपर्ट कमेटीच्या रिपोर्टनुसार कंपनीच्या कार्सनी साल 2016 मध्ये देशाची राजधानी दिल्लीमध्ये अंदाजे 48.678 टन नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन केले आहे. 

 

पुन्हा अशा प्रकारच्या कार नाही बनवणार 
कंपनीने आपल्या जुन्या चुकांमधून शिकत परत अशा प्रकारच्या कार न बनवण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीची स्पोर्ट कार निर्माता कंपनी पोर्शे (Porsche) कंपनीने आधीच घोषणा केली आहे की, ती आता यापुढे कधीही डिझेलवर चारणारी गाडी बनवणार नाही. कंपनीचे सीईओ ओलिवर ब्लूमने एका इंटरव्ह्यूत सांगितले होते की, भविष्यात पोर्शे कार्सना फक्त पेट्रोल, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये बनवले जाईल, त्यासोबत त्यांचे सगळे लक्ष ईलेक्ट्रीकल कारवर आहे.


काय आहे कारण ?
कंपनीचे डीझल कार बनवण्यामागचे कारण खुप रंजक आहे. खरतर दिग्गज कंपनी पोर्शेची पॅरेंट कंपनी फॉक्सवॅगनला तीन वर्षांपूर्वी कारमध्ये लावलेल्या कार्बन उत्सर्जन एककांमध्ये मुद्दामुन गडबडी केल्यांत दोषी आढळले. फॉक्सवॅगनने वर्ष 2015 मध्ये अमेरिकेच्या चौकशीत स्वीकार केला की, त्यांनी जगभरात 1.1 कोटी कारमध्ये इक्विपमेंट लावले, जे ज्यास्ती कार्बन उत्सर्जनला कमी दाखवतात. या प्रकारे कंपनीची सगळी कार प्रदुषण एककात कमी आढळून यायची. 


किती रूपयांचे झाले नुकसान
कंपनीचे खोटे लवकर पकडले गेले आणि जगभरात खुप नाच्चकी झाली. तर या फ्रॉडमुळे कंपनीवर 27 अब्ज यूरो म्हणजेच 2.28 लाख कोटींचा दंड लावण्यात आला. त्याशिवाय कंपनील त्यांच्या लाखो कार्सना परत बोलवावे लागले. कंपनी आज जगभरातील अनेक न्यायालयात अनेक खटल्यांचा सामना करत आहे, तर रेटिंग एजंसी Fitch ने कंपनीने च्या रेटींगमध्ये घट केली.


कोणती होती गडबडी ?
टेलीग्राफनुसार वर्ष 2008 ते 2015 दरम्यान कंपनीने 1,98,500 Volkswagen कार्समध्ये E189 इंजिन लावले होते. त्यात 36,500 Audi गाड्या होत्या, ज्या प्रदुषणाला कमी दाखवायचे काम करत होत्या. यात एका सॉफ्टवेअरचा वापर केला जायचा, जे टेस्ट ड्राइवदरम्यान इंजिनची पॉवर आणि परफॉर्मंसला नार्मल करत होते. यामुळे प्रदुषण कमी होत होते, आणि टेस्टमध्ये पास केले जायते. पण नंतर रोडवर चालवताना ठरलेल्या प्रदुषणापेक्षा 40 टक्के जास्त प्रदुषण होत आहे असे लक्षात आले.

बातम्या आणखी आहेत...