आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 17th Lok Sabha: This Year, 300 New MP's And 197 People Are Second Time In Parliament

१७ वी लोकसभा : यंदा संसदेत ३०० नवखे खासदार तर १९७ जणांची दुसरी वेळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - १७ व्या लोकसभेच्या ५४२ जागांचे संपूर्ण निकाल जाहीर झाले. भाजपला ३०३ व काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या. द्रमुक २३ जागांसह तिसऱ्या, तर वायएसआर व टीएमसी प्रत्येकी २२ जागा संपादन करून चौथ्या क्रमांकावर राहिल्याचे स्पष्ट झाले. तामिळनाडूच्या वेल्लोर जागेवरील निवडणूक रद्द झाली होती. ३०० खासदार पहिल्यांदाच लोकसभेत पाेहोचले आहेत. २०१४ मध्ये ३१४ नवखे खासदार होते. यंदा १९७ खासदार दुसऱ्यांदा संसदेत पोहोचले . २०१४ मध्ये दुसऱ्यांदा निवडलेल्या खासदारांची संख्या १६९ होती. दोनपेक्षा जास्त वेळा निवडलेल्या खासदारांची संख्या ४५ आहे. २०१४ मध्ये ५८ खासदार होते. ६ राष्ट्रीय पक्षांच्या ३९७ खासदारांचा समावेश होतो. 


> सपा-बसपा-रालोदची महाआघाडी असूनही रालोआने उत्तर प्रदेशात ६४ जागी विजय मिळवला. भाजपला ४९.५ टक्के मते मिळाली. महाआघाडीला ३८.९७ टक्के (सपा-१७.९८, बसपा-१९.३१, रालोद-१.६८ टक्के) मते मिळाली. काँग्रेसचा मतांचा टक्का ६.२६ टक्के राहिला. काँग्रेस उत्तर प्रदेशात महाआघाडीत सामील असती तर राज्यात भाजपला ८ जागा गमावण्याची वेळ आली असती. 

 

वय: सरासरी वय ५४ वर्षे, १२ टक्के ४० हून कमी वयाचे

१७ व्या लोकसभेत पोहोचलेल्या खासदारांचे सरासरी वय ५४ वर्षे आहे. १२ टक्के ४० हून कमी वयाचे आहेत. ही संख्या गेल्या वेळपेक्षा ४ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वेळी ८ टक्के खासदारांचे वय ४० पेक्षा कमी होते. महिला खासदारांचे वय पुरुषांच्या तुलनेत ६ वर्षांनी कमी आहे. ६ टक्के खासदार यंदा ७० हून अधिक वयाचे आहेत. ४१ ते ५५ वर्षांदरम्यानचे ४१ टक्के  व ५६-७० दरम्यानचे ४२ टक्के.

 

शिक्षण : यंदा ३९४ खासदार पदवीधर, २५ वर्षांत सर्वात कमी 
यंदा ३९४ पदवीधर खासदार निवडून गेले. २७ टक्के खासदार १२ वीपेक्षा कमी शिकलेले आहेत. २०१४ च्या तुलनेत ही संख्या ७ टक्क्याने जास्त आहे.  २०१४ मध्ये २० टक्के खासदार १२ वी पेक्षा कमी शिकलेले होते. १९९६ पासून आतापर्यंत ७ लोकसभा निवडणुकीत यंदा पदवीधर खासदारांची संख्या खूप कमी झाली. १९९६ पर्यंत लोकसभेत ७५ टक्क्यांहून जास्त पदवीधर खासदार असत.

 

निम्मी लोकसंख्या : ७८ महिला खासदार, हाही यंदाचा विक्रम

१७ व्या लोकसभेत आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक खासदार संसदेत निवडून गेल्या. यंदा एकूण ७८ महिला खासदार निवडून आल्या. देशभरात निवडणुकीत एकूण ७१६ महिलांनी आपले नशीब आजमावले होते. २०१४ मध्ये ६२ महिला खासदार निवडून गेल्या होत्या. यंदा संसदेत १४ टक्के महिला खासदार असतील.  पहिल्या लोकसभेच्या तुलनेत यंदा महिला खासदारांची संख्या ५ टक्क्यांनी वाढली.इतर देशांच्या तुलनेत संख्या अल्प आहे. रवांडाच्या संसदेत सर्वाधिक ६१ टक्के महिला खासदार आहेत. आफ्रिका-४३ टक्के, ब्रिटन-३२ टक्के, अमेरिका-२४ टक्के, बांगलादेश- २१ टक्के .

 

व्यवसाय : ३९ टक्के सामाजिक कार्यकर्ते, २३ टक्के व्यापारी

लोकसभेत पोहोचलेल्या खासदारांपैकी ३९ टक्के खासदारांनी आपला व्यवसाय राजकारण, सामाजिक कार्य असे नमूद केले आहे. ३८ टक्के खासदारांनी कृषी कार्यकर्ता,२३ टक्के खासदारांनी व्यापार हा पेशा सांगितला. ४ टक्के वकील, ४ टक्के वैद्यकीय क्षेत्र, ३ टक्के कलाकार, २ टक्के अध्यापन क्षेत्रातील आहेत. 
 

सर्वाधिक मतांचा विक्रम इंदूरच्या लालवाणींच्या नावावर
> भाजपचे इंदूर येथील उमेदवार शंकर लालवाणी १७ व्या लोकसभेत सर्वाधिक मते मिळवणारे खासदार ठरले. त्यांना विक्रमी १० लाख ६८ हजारांवर मते पडली. 
 

इतरही महत्वाच्या बाबी

> ५४२ जागांचे निकाल जाहीर, भाजपला ३०३ व काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या

> १७ व्या लोकसभेत भाजपने पहिल्यांदाच ३०० हून जास्त जागा मिळवल्या. याआधी ८ निवडणुकीत कोणत्याही पक्षाला ३०० हून जास्त जागा मिळवता आल्या नव्हत्या. 

> २०१४ मध्ये ३१४ खासदार पहिल्यांदा संसदेत पोहोचले होते, यंदा ६ राष्ट्रीय पक्षांचे ३९७

> यंदा दुसऱ्यांदा निवडून गेलेल्या खासदारांची संख्या ४५ , २०१४ मध्ये ५८ खासदार होते

> उत्तर प्रदेशात भाजपला ६४ जागा, महाआघाडीला एक

> यूपीत काँग्रेस, सपा-बसपा आघाडीत सहभागी झाली असती तर भाजपच्या ८ जागांत घट