आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूरमध्ये क्रुरपणे उंटांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला, गौ रक्षा समितीकडून 18 उंटांची सुटका 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- राजस्थान राज्यातील पुष्करहून सोलापूर येथे उंटांची वाहतूक विना परवाना व दाटीवाटीनी घेऊन जात असल्याने उंटानी भरलेले ट्रक गौ रक्षा समितीचे पदाधिकारी अक्षित अग्रवाल, नीरव अग्रवाल, दर्शन पाटील, जितेंद्र अहिरे, यांनी महामार्गावर पकडला. पोलिसांनी ट्रकसह 18 ऊंट ताब्यात घेऊन नवापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. या कारवाईत उंटाची तस्करी करणार्‍या आंतरराज्यीय टोळी आहे का ? याचा तपास नवापूर पोलिस करीत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास अक्षित अग्रवाल व मित्र नीरज अग्रवाल गुजरात राज्यातील सोनगड येथे मोटरसायकलीने जात असतांना नागपूर-सुरत महामार्गावरील रोकड्या हनुमान मंदिराजवळून ट्रक क्रमांक (आरजे 14 जी एच 9572) सुरतकडून धुळ्याकडे जात असतांना यात 18 उंट दाटीवाटीनी भरलेले होते. पोलिसांनी तपास केला असता ट्रक चालकांकडे वाहतूकीचा परवाना नव्हता. त्यामुळे प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देण्यास प्रतिबिंब अधिनियम व मोटरवाहन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ट्रक मधील 18 उंटाच्या पशु मेळा पुष्कर येथील पावत्या आढळून आल्या असे सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर शिंपी यांनी सांगितले. पोलिसांनी ट्रकसह 18 ऊंट ताब्यात घेऊन चालक खालीद मामला (वय 28 रा. रिठाठ तालुका फिरोजपूर जिल्हा नुह हरियाणा) व सलमान फरमान कुरेशी (वय 18 रा खेतीपूरा मोहल्ला, वार्ड क्रमांक 21 जिल्हा बागपथ उत्तर प्रदेश) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राण्यांची क्रुरपणे वाहतूक केली जात असल्याने वन्यप्रेमीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.