18 जानेवारी 2019 / 18 जानेवारी 2019 आजचे राशिभविष्य : शुक्रवारी या राशींसाठी आहे खास दिवस

Jan 18,2019 12:00:00 AM IST

शुक्रवार, 18 जानेवारी 2019 रोजी पौष शुद्ध द्वादशी असून रोहिणी नक्षत्राच्या योगाने ब्रह्मा नावाचा योग जुळून येत आहे. शांततेच्या प्रयत्नासाठी, शांतीदायक कार्यांसाठी हा योग उत्तम आहे. शास्त्रानुसार, एखादे भांडण मिटवायचे असल्यास या योगात प्रयत्न करायला हरकत नाही. यश नक्की मिळेल. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 7 राशींच्या व्यक्तींना पैशांच्या बाबतीत आनंदवार्ता कळण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना काम वाढणार आहे. विद्यार्थी व गृहिणींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे. उर्वरित 5 राशींसाठी मात्र संमिश्र दिवस.


पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक राशीनुसार आपले राशिभविष्य...

मेष: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८ कितीही वाढते खर्च असले तरी पैशाची कमतरता भासणार नाही. आज स्वत:ची हौस भागवण्यासाठी सढळ हस्ते खर्च कराल. प्रवासात रखडपट्टी होईल.वृषभ: शुभ रंग : हिरवा | अंक : ६ कोणत्याही क्षेत्रात असलात तरी काही चढाओढीचा सामना करावाच लागेल. जुन्या अनुभवींचे सल्ले उपयुक्त ठरतील. जोडीदाराकडून सुवार्ता येतील.मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १ काही क्षुल्लक अडचणी मन:स्वास्थ्य बिघडवतील. घरात वडीलधाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल. एखाद्या समारंभात किंवा प्रवासात मौल्यवान ऐवज जपा.कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६ तुम्ही योग्य वेळी घेतलेले अचूक निर्णय कारणी लागतील. प्रगतीच्या दिशेनेच तुमची वाटचाल चालू राहील. गृहीणींना काटकसर करण्याची गरज नाही.सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८ कार्यक्षेत्रातील मानसन्मान वाढेल. विरोधकांचा विरोध मावळेल. आज मित्रमंडळींच्या फार नादी न लागणे हिताचे, कारण ते चुकीचे सल्ले देतील.कन्या : शुभ रंग : पिवळा| अंक : ७ उच्चशिक्षित मंडळींना विदेशात नोकरीच्या संधींची चाहूल लागेल. आज तुमचा देवधर्म व दानधर्माकडे ओढा असेल. आजी आजोबा नतवंडात रमतील.तूळ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३ आज भावना व कर्तव्य याचा ताळमेळ साधणे कठीण जाईल. कदाचित घरातील वडीलधाऱ्यांची नाराजी पत्करावी लागेल. मोहापासून दूर रहा, प्रतिष्ठेस जपा.वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५ महत्वाच्या चर्चा व बैठकी यशस्वी होतील. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भांडणातही यशस्वी मध्यस्ती करू शकाल. वैवाहीक जोडीदाराशी छान सूर जुळतील. मस्त दिवस.धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : ४ आज आर्थिक अंदाज कोलमडण्याची शक्यता आहे.काही अनपेक्षित खर्च दार ठोठावतील. ज्येष्ठांना काही अरोग्यविषयक चाचण्या करून घ्यावा लागणार आहेत.मकर : शुभ रंग : मोतिया | अंक : ५ आज तुमचा ऐषआरामी जीवनाकडे कल राहील. मोठेपणा घेण्यापायी खर्च ओढाऊन घ्याल. मित्रांनी केलेल्या खोटया स्तुतीने भाराऊन जाल. चैन कराल.कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ९ कुटुंबात सामंजस्याचे वातावरण असल्याने आज तुम्ही प्रसन्नचित्त असाल. घराबाहेरही आपल्या कतृतवाचा ठसा उमटवू शकाल. मुलांना दिलेले शब्द पाळाल.मीन : शुभ रंग : निळा | अंक : २ बराचवेळ घराबाहेर जाईल. आज तरूणांना कुसंगत आकर्षित करेल. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील. गृहीणींच्या जबाबदाऱ्या वाढतील. कायदा तंतोतंत पाळा.
X