आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलनात १८ ठार, १०० पर्यटक अडकले; ६ जिल्ह्यांत पावसाचे थैमान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिमला- हिमाचल प्रदेशात गेल्या चोवीस तासांत सलग होणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला. सर्वात जास्त ४ बळी सोलन, तीन मंडीत व जज्जरमध्ये २ नागरिकांचा मृत्यू झाला. याशिवाय चंदिगड-सिमला महामार्गावर भूस्खलन झाले. येथील ढिगारा हलवण्याचे काम सुरू आहे. 


दुसरीकडे, प्रशासनाने राज्यातील शाळांना सुटी जाहीर केली. सिमला, मंडी, किन्नौर, कुलू, चंबा, हमीरपूर, सोलन, बिलासपूर व ऊनामध्ये शाळांना सुटी जाहीर केली आहे. मंडी जिल्ह्यात पंडोह धरणातून सोमवारी विसर्ग करण्यात आला. यामुळे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना व पर्यटकांना इशारा जारी करत व्यास नदीजवळ न जाण्यास सांगितले आहे. हवामान विभागाने येत्या ४८ तासांत राज्यात पावसाचा इशारा जारी केला आहे. सिमल्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलन झाले आहे. 


७ राज्यांमध्ये ७७४ ठार 
केरळनंतर आता तामिळनाडूतील नऊ जिल्ह्यांत पूर संकट ओढवले आहे. हवामान विभागाने सोमवारी १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. इशारा दिलेल्या राज्यांमध्ये केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, हिमालय क्षेत्र व पूर्व भारतातील राज्यांचा समावेश आहे. हवामान विभागाने उत्तर प्रदेशातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या २४ तासांत उत्तराखंडच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो. पावसामुळे आतापर्यंत केरळसह ७ राज्यांत ७७४ जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथक पुरात अडकलेल्यांना मदत करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...