आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाची नोकरी देण्याचे दिले आमिष, शैक्षणिक संस्थेचे बनावट नियुक्तीपत्र देऊन १८ लाखांची फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - औरंगाबादच्या वाळूज येथील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षकाची नोकरी देतो म्हणून १८ लाख रुपये घेऊन बनावट नियुक्तिपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. गणेश पालवे, सुनील पालवे, गोरक्षनाथ आसाराम बळी, श्रीराम गंगाराम डोईफोडे, पंजाबराव सपकाळ, अण्णा आंधळे (सर्व औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. 


नऊ ते दहा महिन्यापूर्वी गणेश रामकिसन वाघ (जालना) यांना शिक्षकाची नोकरी देतो म्हणून औरंगाबादेतील  सहा जणांनी १८ लाख रुपये घेऊन वाळूज येथील एका शैक्षणिक संस्थेचे बनावट नियुक्तिपत्र दिले. या नियुक्तीनंतर गणेश वाघ यांनी त्या संस्थेत सहा ते सात महिने काम केले. परंतु, पगार होत नसल्यामुळे त्यांनी संबंधितांकडे वारंवार मागणी केली. पगार मिळत नसल्यामुळे त्यांनी माझे पैसे मला परत द्या, मला नोकरी नको म्हणून राजीनामाही दिला. घेतलेले १८ लाख रुपये देतो म्हणून संबंधितांनी ३ लाखांचे चेक दिले. परंतु, चेकही वटले  नाही. 

बातम्या आणखी आहेत...