आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरवर्तन, धमक्यांमुळे 18 महिला खासदार निवडणूक लढवणार नाहीत, अमानुष असल्याचे म्हटले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅगन स्पॅशिया | लंडन

इंग्लंडच्या १८ महिला खासदारांनी पुढील महिन्यात होणारी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या खासदारांनी आपल्या मतदारांना पत्र लिहून सांगितले की, आपली जागा सोडण्याचा निर्णय त्यांनी दीर्घ काळापासून सुरू असलेला दुर्व्यवहार आणि धमक्यांमुळे घेतला आहे. इंग्लंडच्या सत्ताधारी काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदार हिदी अॅलन यांनी सांगितले की, दुर्व्यवहार अमानुष झाला आहे. यामुळे निवडणुकीत भाग घेणार नाही. अॅलन यांनी सांगितले की, माझ्या खासगी आयुष्यातील हस्तक्षेप, दुर्भावना आणि धमक्यांना कंटाळली आहे. 


हे सर्व जीवनाचा भाग झाला आहे. कोणालाही आपल्या कामात धमक्या, भीती दाखवणारे ईमेल, अपशब्दांचा सामना करावा लागू नये. तसेच घरी कोण्त्याच गोष्टीला घाबरू नये. इंग्लंडमध्ये आतापर्यंत सुमारे ५० खासदारांनी निवडणुकीपासून लांब रहायचा निर्णय घेतला आहे. माध्यमातील वृत्तानुसार या १८ महिला खासदारांचा निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर महिला हक्कासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अॅलन यांच्याशिवाय कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदार कॅरोलिन स्पेलमॅन यांनी वृत्तपत्रातील स्तंभात लिहिले आहे की, महिला खासदारांनसोबतच्या आॅनलाइन दुर्व्यवहारात लिंगभेदाच्या गोष्टींचाही वापर केला जातो. 

जॉन्सन यांच्यावर महिला खासदारांना अपशब्द वापरल्याचा आरोप
या वर्षी सप्टंेबरमध्ये संसदेत ब्रेग्झिटवर चर्चेदरम्यान महिला खासदार पाउला शेरिफ यांनी आरोप केला की, सोशल मीडियावर बोरिस जॉन्सन यांच्या वक्तव्याचा वापर ट्रोलसाठी होत आहे. यावर जॉन्सन यांनी महिला खासदारावर ओरडत म्हटले होते की, माझ्या आयुष्यात असे कधीच एेकले नाही. या वक्तव्यानंतर इंग्लंडमध्ये त्यांना मोठा विरोध झाला. नंतर जॉन्सन यांनी खुलासा देत म्हटले की, त्यांच्या वक्तव्य चुकीच्या अर्थाने घेतले गेले.

बातम्या आणखी आहेत...