आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीजिंग- रशियातील FaceApp जगभरात लोकप्रिय झाले आहे. युझर्स याचा वापर करुन आपल्या म्हातारपणीचे फोटोज सोशल मीडियावर टाकत आहे, पण याच्या मदतीने चीनच्या बीजिंगमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाला त्यांचा 18 वर्षांपूर्वी अपहरण झालेला मुलगा परत मिळाला आहे. त्याचे नाव यू वीफेंग(21) आहे आणि आता तो कॉलेजमध्ये शिकतो. तीन वर्षांचा असताना त्याचे अपहरण झाले होते.
पोलिसांना फोटो कनव्हर्ट करण्याची आयडिया आली
पोलिसांना एक कल्पना सुचली की, मुलाची लहानपणीचा फोटो कनव्हर्ट करुन तरुण वयात कसा दिसत असावा तो पाहावे. त्यानंतर पोलिसांनी त्या फोटोच्या आधारे त्याचा शोध घेत त्याला शोधून काढले.
पोलिसांनी सांगितले की, वीफेंग 6 मे 2001 ला कंस्ट्रक्शन साइटवरुन बेपत्ता झाला होता. त्यावेळी वीफेंगचे वडील फोरमॅन म्हणून काम करत होते. मुलगा परत मिळाल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याचे संगोपन करणाऱ्या दाम्पत्याचे आभार मानले आहेत. सुरुवातील यू वीफेंगने त्याचे अपहरण झाले होते, आणि त्याचे खरे आई-वडील दुसरेच कोणीतरी आहेत असे मानायला तयार नव्हता. नंतर त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली आणि त्यात सगळ समोर आल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.