Home | International | Other Country | 18 Year Old Boy, transforms boat into luxury holiday home for his mother and sister

आई आणि बहिणीसाठी एका युवकाने 2 महिन्यात भंगार असलेल्या जहाजाला बनवले लग्झरी हॉलिडे होम, लाकडाचे उत्तम काम केल्याबद्दल कॉलेजमध्येही मिळाला आहे अवॉर्ड 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - May 25, 2019, 05:34 PM IST

जुने जहाज 4.41 लाख रुपयांमध्ये खरेदी करून 2 लाख 47 हजार त्यावर केले खर्च... 

 • 18 Year Old Boy, transforms boat into luxury holiday home for his mother and sister

  लंडन/बेन्टम : लँकेस्टरमध्ये राहणार 18 वर्षांचा बिली वाल्डेन यशस्वी कारपेंटर आहे. त्याने त्याने अशातच एका भंगार असलेल्या जहाजाला लग्झरी हॉलिडे हाउसमध्ये रूपांतरित केले आहे. त्याने ते 4.41 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते आणि त्याला नंतर सुमारे 2.47 लाख रुपयांचा खर्च आला. आता बिली आई आणि बहिणीसोबत यामध्ये सुट्ट्या एन्जॉय करतो. आता याची किंमत साडे 10 लाख रुपयापेक्षाही जास्त आहे. बिली म्हणतो - एवढे महागाचे जहाज खरेदी करण्याची आमची परिस्थिती नव्हती, पण आम्ही याला स्वस्तात तयार केळवे आहे.

  आईने दिली आयडिया...
  बिलीने चार वर्षांपूर्वी सुतारकाम सुरु केले होते. हात बसल्यावर आता बिलीला काही खास करायचे होते. याचदरम्यान त्याने आई आणि बहिणीसोबत टेविटफील्डपासून ते प्रेस्टनपर्यंतचा प्रवास कॅनल बोटने केला. यामध्ये बिलीला खूप मजा आली. यादरम्यानच आईने त्याला जुनी बोट घेऊन त्याला रिनोव्हेट करण्याची आयडिया दिली. बोट हाउसमध्ये दोन रम आहेत. एक शानदार बाथरूम, काचेचे दरवाजे जे डेकच्या बाजूने उघडतात. बोटमध्ये ऑडी कारचे सीट लावलेले आहेत.

  प्रथम श्रेणी एआयएम अवॉर्ड जिंकला आहे बिली...
  बिलीने सांगितले, माझ्या वयाची मुले व्हिडीओ गेम आणि दुसरे खेळ खेळत असतात. पण मी मात्र माझा वेळ वर्कशॉपमध्ये घालवतो. बिलीने लँकेस्टर आणि मॉर्कोमेबे कॉलेजमध्ये तीन वर्षे सुतारकामाचे शिक्षण घेतले. केवळ एका वर्षातच त्याने फर्स्ट स्टेज एआयएमचा अवाॅर्ड मिळवला.

  15 तास काम करतो, लायसन्सची केली आहे तरतूद...
  बिली म्हणतो, मला माझे काम करायला खूप मजा येते. मी माझ्या दुकानात 15 तास काम करतो. आता एक टूरिस्ट व्हॅन फॉक्सव्हॅगनवर काम सुरु आहे. बिलीचे काम पाहता द इंस्टीट्यूट ऑफ कारपेंटर द्वारे लायसन्स देण्याचीही तरतूद केली आहे.

 • 18 Year Old Boy, transforms boat into luxury holiday home for his mother and sister
 • 18 Year Old Boy, transforms boat into luxury holiday home for his mother and sister

Trending