आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 180 Celebrities, Including Nasiruddin, Against The Case Of Sedition Against 49 Celebrities, Said 'Our Voice Cannot Be Suppressed'

सरकार आमचा आवाज दाबू शकत नाही, 49 प्रसिद्ध व्यक्तींवर झालेल्या देशद्रोहाच्या केसविरुद्ध नसीरुद्दीन यांच्यासह 180 सेलिब्रिटी, म्हणाले - 'आमचा आवाज दाबू शकत नाही' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तीन महिन्यापूर्वी दिग्दर्शक श्याम बेनेगल, अनुराग कश्यप, मणीरतनम, शुभा मुद्गल आणि अपर्णा सेन यांच्यासह 49 व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मॉब लिंचींगच्या घटनांवर चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर 3 ऑक्टोबरला बिहारच्या एका न्यायालयाच्या आदेशावरुन त्या सर्व व्यक्तींविरुद्ध देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता या 49 व्यक्तींना अभिनेता नसीरूदीन शाह आणि इतिहासकार रोमिला थापर यांच्यासह 180 पेक्षा जास्त व्यक्तींचे समर्थन मिळाले काही. सोमवारी या व्यक्तींनी एक नवे पत्र लिहीले आहे.


मॉब लिंचींगवर बोललल्यावर देशद्रोह कसा
?
180 व्यक्तींमध्ये नसीरुद्दीन शाह आणि रोमिला थापर यांच्याव्यतिरिक्त लेखिका नयनतारा सहगल, डान्सर मल्लिका साराभाई आणि गायक टीएम कृष्णा यांचीही नावे आहेत. त्यांनी पत्रात लिहिले की "आमच्या सांस्कृतिक समुदायातील 49 सह्योगींविरुद्ध गुन्हा यामुळे दाखल केला , कारण त्यांनी समाजातील देशात होत असलेल्या मॉब लिंचींगच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करणे आपले कर्तव्य समजले." यासोबतच हा प्रश्न देखील उपस्थित केला की, नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी न्यायालयाचा दुरुपयोग केला जाणे शोषण नाही का ?पत्रात या या व्यक्तींनी स्वतःला भारतीय सांस्कृतिक समाजाचा सदस्य सांगत लिहीले की, मॉब लिंचिंगबद्दल जे पत्र पंतप्रधानांना लिहिले होते, ते या प्रत्येक शब्दाचे समर्थन करतात. या व्यक्तींनी जुने पत्र शेअर करून सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कायदेशीर समुदायांना अपील केली आहे की, त्यांनीही त्यांची साथ द्यावी. त्याच्यानुसार, ते मॉब लिंचींगविरुद्ध नागरिकांचा आवाज दाबाने आणि त्यांचे शोषण यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या दुरुपयोगाविरुद्ध आवाज उठवत राहतील.  

सरकारने फेटाळले होते आरोप... 
कला, साहित्य आणि इतर क्षेत्रांशी निगडित 49 व्यक्तींनी 23 जुलैला मोदी यांच्या नावे पत्र लिहिले होते. यामध्ये मुस्लिम, दलित आणि इतर समुदायाविरुद्ध गर्दीने केलेल्या हिंसेवर (मॉब लिंचिंग) प्रतिबंध लावण्याची मागणी केली आहे. पत्रात पंतप्रधानही संवाद सधत लिहिले गेले आहे की, "मे 2014 नंतर जेव्हापासून तुमचे सरकार सत्तेत आले आहे, तेव्हापासून अल्पसंख्य आणि दलितांविरुद्ध हल्ल्याचे 90% प्रकरणे दाखले झाली आहेत. तुम्ही संसदेत मॉब लिंचिंगच्या घटनेची निंदा करता, जे पुरेसे नाहीये. प्रश्न हा आहे की, तुम्ही अशा अपराध्यांविरोधात कारवाई का करत नाही ?" मात्र सरकारने पत्रात  फेटाळले होते. 

 

49 व्यक्तींच्या पत्राला उत्तर म्हणून 62 व्यक्तींनी खुले पत्र लिहिले होते... 
49 व्यक्तींच्या पत्राच्या उत्तरात कंगना रनोट, प्रसून जोशी, यांच्यासह 62 व्यक्तींनी खुले पत्र लिहिले होते, त्यांचे म्हणणे होते की, काही लोक निवडक पद्धतीने सरकारविरुद्ध राग व्यक्त करतात. याचा उद्देश केवळ लोकशाहीतील मूल्ये बदनाम करण्याचा आहे. 

बातम्या आणखी आहेत...