आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूचे राज्यात १८४ बळी,जळगाव जिल्ह्यात ३ रुग्णांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यात साथीच्या अाजारांबराेबरच स्वाइन फ्लूचे संकट दिवसेंदिवस गडद हाेत असून, या अाजाराची लागण झालेल्या १६१० रुग्णांवर उपचार करण्यात अाले अाहेत. यातील १८४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण अाहे. विशेष म्हणजे, थंड हवामान असलेल्या पुणे अाणि नाशिकमध्ये सर्वाधिक स्वाइन फ्लूची साथ पसरली अाहे.


नाशिकमध्ये मृत्यूचा अाकडा ४३ वर पाेहाेचला अाहे. सरकारी यंत्रणेकडून स्वाइन फ्लू अाटाेक्यात अाणण्यासाठी विविध उपाय याेजले जात असताना त्यात यश येत नसल्याने यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसत अाहे. यंदा राज्यभरात परतीच्या पावसाला विलंब झाल्याने वातावरणात गारवा व तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने स्वाइन फ्लू व साथीच्या अाजारांना पाेषक वातावरण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात अाहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण पुणे, नाशिक, सातारा व नगरमध्ये अाढळून अाले अाहेत. गणेशाेत्सवापासूनच रुग्णांच्या संख्येत वाढत हाेत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे स्वाइनची प्राथमिक लक्षणे सर्दी, खाेकला, धाप लागणे, दाेन-तीन ताप दिवस राहणे, घसा खवखवणे असे दिसताच तपासणी करण्याचे अावाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


जिल्हानिहाय मृत्यूची संख्या पुढीलप्रमाणे
पुणे : ४६
नाशिक : ४४
अहमदनगर : २१
सातारा : २१
काेल्हापूर : १०
जळगाव : ०३
अकाेला : ०४
बुलडाणा : ०४

 

बातम्या आणखी आहेत...