आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोदकामात मिळाला 188 वर्षे जुना सांगाडा, कवटी पाहून शास्त्रज्ञ म्हणाले-कठीण होते त्याकाळचे जीवन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- इंग्लंडच्या न्यू कॉवेन्ट गार्डन मार्केटमध्ये शास्त्रज्ञांना 19व्या शतकातील स्मशानभूमी सापडली. सर्वातआधी या गार्डनमध्ये त्यांना 6 फुटी सांगाडा सापडला. त्यावरून त्या काळातील परिस्थितीबाबत काही आश्चर्यकारक बाबी समोर आल्या. त्याच्या कवटीचा एक भाग कापलेला होता. एखाद्या शस्त्राने ते कापले असावे असे वाटत होते. अशाच प्रकारचे 100 सांगाडे याठिकाणी सापडले. 

 

संशोधकांनी सांगितले की, या सगळ्यांचा मृत्यू एकाच प्रकारे झाला आहे, कारण त्या सगळ्या सांगाड्यांवर अनेक प्रकारच्या जखमांच्या खुणा होत्या. त्यावरून त्याकाळात जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागत होता, हे समजते. 

 

जगण्यासाठी होता संघर्ष 

- हे सर्व सांगाडे 1830 ते 1880 च्या दरम्यानचे आहेत. त्या काळात लंडनमध्ये जगण्यासाठी संघर्ष करावा लागायचा. त्या काळातील लोक खूप गरीब होते त्यामुळे त्यांच्यावर खूप आत्याचार व्हायचे. त्यासोबतच सांगाड्यांच्या DNA वरून हेही समजले आहे की, त्यावेळी एक जीवघेणा आजार पसरलेला होता, त्यातून शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. 

- लंडनमध्ये आज जो झगमगाट दिसतो तेवढाच त्या काळातील संघर्ष यातून समोर आला आहे. याठिकाणी अनेक महिलांचे आणि लहान मुलांचे सांगाडे मिळाले आहेत. त्यांना अत्यंत क्रूरपणे मापण्यात आले होते. तो काळ लंडनमध्ये शहरीकरणाचा होता. त्या काळातील धनाढ्य लोकांनी गरीबांना जनावराप्रमाणे ठेवले होते. गुलामी करायचे त्यांना काही पैसे मिळायचे पण जे गुलामीला नकार द्यायचे त्यांना मारले जायचे.

 

बातम्या आणखी आहेत...