आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईव्हीएम तपासणीत १८९ यंत्रे सदोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औैरंगाबाद- इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड करून निवडणूक जिंकता येते, असे आरोप करत देशभरात ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले जात असतानाच गेले पंधरा दिवस औरंगाबादेत ईव्हीएमची प्राथमिक तपासणी करण्यात आली. या तपासणीत १८९ ईव्हीएम सदोष आढळून आल्या आहेत. बटण न दबणे, तारीख न दिसणे असे दोष या यंत्रांत आढळले. स्थानिक पुढाऱ्यांनी पहिल्याच दिवशी या तपासणीबाबत उत्साह दाखवला. नंतर मात्र कुणीही फिरकले नाही. शासकीय कला महाविद्यालयात १२ सप्टेंबरपासून भेलच्या १८ आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील १५ अधिकाऱ्यांनी ईव्हीएमची तपासणी सुरू केली होती. 


लोकसभेच्या मतदानासाठी ५४४३ बॅलेट युनिट आणि ३७३९ कंट्रोल युनिट आलेल्या आहेत. त्यापैकी ५० बॅलेट युनिटमध्ये, तर १३९ कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक दोष आढळून आला. बटण नीट दाबले न जाणे, त्यावरचा लाइट न दिसणे तसेच तारीख आणि वेळ चुकीची दाखवणे अशा त्रुटी होत्या. सदोष यंत्रे परत पाठवली जातील, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅटही (व्होटर व्हेरिफियेबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर होणार आहे. ज्या उमेदवाराला मत दिले, ते त्यालाच मिळाले की नाही याची खातरजमा याद्वारे होईल. 

बातम्या आणखी आहेत...