Home | Maharashtra | Vidarva | Akola | 19 cylinders have been seized in raids

स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात १९ सिलिंडर केले जप्त

प्रतिनिधी | Update - Aug 13, 2018, 12:13 PM IST

विना परवानगी सिलिंडरची साठेबाजी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने बाभुळगाव येथून वेगवेगळ्या कंपन्यांचे १९ सिलिंडर जप्

 • 19 cylinders have been seized in raids

  अकोला- विना परवानगी सिलिंडरची साठेबाजी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने बाभुळगाव येथून वेगवेगळ्या कंपन्यांचे १९ सिलिंडर जप्त केले आहेत. लोकवस्तीमध्ये अतिक्रमित जागेत गोडावून असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.


  रविवारी एलसीबीचे प्रमुख पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी पीएसआय रणजितसिंह ठाकूर, पोहेकॉ. गणेश पांडे, शंकर डाबेराव , शक्ती कांबळे, मनोज नागमते, गीताबाई अवचार, यांचे एक पथक गठीत करून त्यांना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या बाभुळगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड लगत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमीत गोडावूनमध्ये सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचे सांगून कारवाई करण्यासाठी पाठवले. त्यानुसार एलसीबीचे पथक हे रविवारी रात्रीच घटनास्थळी पोहोचले. तेथे त्यांना लोकवस्तीमध्ये अतिक्रमण केलेल्या गोडावूनमध्ये एचपी व इंडियन कंपनीचे १९ सिलिंडर दिसून आले.

  या साठ्याबाबत त्यांनी या राष्ट्रपाल वानखडे याला विचारपूस केली असता त्याने योग्य दस्तावेज तथा परवानग्या दाखवल्या नाही. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एचपी कंपनीचे १२ सिलिंडर, एक छोटे इंडियन कंपनीचे सिलिंडर, दोन इंडियन कंपनीचे गॅस सिलिंडर, चार एचपी व इंडियन कंपनीचे कमर्शियल सिलिंडर असे १९ सिलिंडर जप्त केले. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.


  नागरिकांनी माहिती दिल्यास कारवाई करू
  लोकवस्तीमध्ये विनावरवानगी ज्वलनशील पदार्थाच्या वस्तूची साठवणूक होत असेल, तर पोलिसांना माहिती दिल्यास कारवाई करू. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
  - कैलास नागरे, प्रमुख एलसीबी

Trending