आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 % कर्मचारी नव्या नोकरीत यशस्वी: कंपन्यांतील 5,247 व्यवस्थापक, 20 हजार कर्मचाऱ्यांवर हार्वर्डचे संशोधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉस्टन - जगभरातील १९% कर्मचारीच नवीन नोकरीत रुजू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत स्वत:ला सिद्ध करू शकतात. ४६% प्रकरणांमध्ये आपण चुकीच्या माणसाची निवड केल्याची खंत वर्षभराच्या आतच बॉसला वाटत असते. ‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू’मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली. अमेरिकेतील मॅनेजमेंट फर्म ‘लीडरशिप आयक्यू’च्या मदतीने जगभरातील ३१२ कंपन्यांमध्ये ५,२४७ व्यवस्थापक व २० हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर तीन वर्षांपर्यंत संशोधन करण्यात आले.  


चांगल्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात व्यवस्थापक किती यशस्वी ठरतात व कर्मचारी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर स्वत:ला कितपत सिद्ध करतात याची माहिती घेण्यासाठी हे संशोधन केले गेले. यात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केवळ ११% कर्मचारी त्यांची योग्यता नसल्याने नोकरीत फ्लॉप ठरतात. उर्वरित ८९% कर्मचारी नवीन ठिकाणी ताळमेळ बसवू शकत नाहीत. २६% लोक नवीन नोकरीत मिळणाऱ्या  फीडबॅकला सकारात्मक स्वरूपात घेण्यात अयशस्वी ठरतात. भावनात्मकदृष्ट्या २३% लोक नवीन जागी समाधानी नसतात. त्याचा परिणाम कामावर स्पष्टपणे दिसून येतो. १७% लोक कामाच्या नवीन जागी स्वत:ला प्रेरित ठेवू शकत नाहीत. तर नवीन नोकरी ही आपल्या स्वभावाला अनुकूल नसल्याचे १५% लोकांना वाटत असते. केवळ ११% कर्मचाऱ्यांनी नवीन नोकरीच्या हिशेबाने आपल्यात योग्यता नसल्याचे प्रांजळपणे मान्य करतात. संशोधन टीममधील मार्क मर्फी म्हणाले की, जगभरातील कंपन्यांमध्ये नियुक्त्यांची प्रक्रिया कठीण झाली आहे. इतकी कठीण प्रक्रिया असताना त्याचे परिणाम जाणून घेण्यासाठी हे संशोधन केले गेले. यात तांत्रिक कौशल्य दुसऱ्या क्रमांकावर गेल्याचे आम्हाला आढळले. वास्तविक पाहता नवीन नोकऱ्यांमध्ये लोक स्वत:ला सुरक्षित मानत नाहीत. 

 

चुकीची नोकरी निवडल्याचे १५% लोकांना वाटते 

- २६% लोक नवीन नोकरीच्या जागी सहकारी किंवा बॉसकडून मिळणाऱ्या फीडबॅकला सकारात्मक पद्धतीने घेत नाहीत. 
- २३% लोक कामाच्या नवीन ठिकाणी भावनात्मकदृष्ट्या जोडल्या जात नाहीत. 
- १७% लोकांना जुने सहकारी आणि प्रेरणादायी वातावरणाची कमतरता जाणवते.  
- यामुळे नोकरीच्या मुलाखतीत तांत्रिकऐवजी मनोवैज्ञानिक प्रश्न विचारण्याचा ट्रेंड वाढला आहे. 
- नवीन नोकरीच्या हिशेबाने आपल्याकडे योग्यता नसल्याचे केवळ ११% कर्मचाऱ्यांना वाटते. 

बातम्या आणखी आहेत...