आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BFला पोलिसांपासून वाचवण्यासाठी तरुणीने उचलले असे पाऊल, मेंदूची नस फाटली, आईने सांगितली करुण कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंड -  येथील सेफ्टन परिसरातील एका 19 वर्षीय तरुणीच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंब प्रचंड धक्क्यात आहे. डॉक्टरने जेव्हा कुटुंबीयांना मृत्यूचे कारण सांगितले तेव्हा कुटुंबीयांना अक्षरशः धक्का बसला. ब्यूटीशियन असलेल्या 19 वर्षांच्या जॉर्जियाने BF ला वाचवण्यासाठी असे काही केले की, तिच्या मेंदूची नस फाटली आणि तिचा मृत्यू झाला. 


जॉर्जिया आणि नोलान रात्री उशिरा एका पार्टीहून घरी येत होते. तेव्हाच त्यांना पोलिस दिसले. तिला BF ची ड्रग्जची सवय माहिती होती. गाडीमध्ये पार्टी ड्रग्ज असल्याचे तिला माहिती होते. त्यामुळे तिने नोलानला वाचवण्यासाठी 4 पाकिट ड्रग्ज पॉलिथीनमध्ये गुंडाळले आणि थेट गिळून घेतले. पोलिसांनी त्यांना अडवले तर दोघे चेकिंगमधून सुखरुप निघाले. पण यादरम्यान तिने ज्या पॉलिथिनमध्ये गुंडाळून ड्रग्ज गिळले होते ती पोटात फाटली आणि संपूर्ण ड्रग्ज तिच्या शरिरात पसरले. 


अचानक बिघडली तब्येत 
जॉर्जियाला अचानक अॅटॅक येऊ लागले. ती बेशुद्ध झाली. नोलान तिला घेऊन लगेचच हॉस्पिटलमध्ये गेला. पण जॉर्जियाच्या शरिरात ड्रग्डचे हे विष वेगाने पसरले होते आणि तिचे अनेक अवयव विचित्र प्रकारच्या हालचाली करत होते. त्यानंतर अतिरिक्त प्रेशरमुळे तिच्या मेंदूची नस फाटली आणि तिने अखेरचा श्वास घेतला. 


कुटुंबीयांनी केवे अवयवदान 
जॉर्जियाच्या मृत्यूमुळे तिचे कुटुंब आणि BF ला धक्का बसला आहे. जॉर्जियाच्या आईने कोर्टात जे काही म्हटले ते ऐकूण सगळ्यांना धक्का बसला. तिचा BF देखिल रडू लागला. आई म्हणाली, आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा तिचे शरीर पाईपांनी वेढलेले होते. डोक्याच्या सर्व बाजुला रक्तच रक्त होते. कालपर्यंत सर्वांना हसवणारी आमची मुलगी निपचित पडून होती. आता आम्ही परत कधी हसू शकणार नाहीत. तिचे अवयव दान करण्याबाबत त्या बोललल्या. तर जॉर्जियाच्या मत्यूनंतर तिच्या BF ला क्लास-ए ड्रग्स बाळगल्याप्रकरणी 16 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...