आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंड : एका ड्रॉवरमध्ये सापडला 19 वर्षांपूर्वीचा मोबाइल, चालू करताच बॅटरी 70% चार्ज होती 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - नोकियाचा मोबाइल ३३१० पुन्हा एकदा चर्चेत आहे. याला कारणही तसेच आहे. इंग्लंडमधील अॅलेस्मेरे बेटावर राहणाऱ्या केविन मूडी यांच्या घरात १९ वर्षे जुना नोकिया सापडला. त्यांनी तो स्वीच ऑन केला. तेव्हा इतक्या वर्षांनंतरही तो ७० टक्के चार्ज निघाला. केविन म्हणाले,काही दिवसांपूर्वी ते घराची किल्ली शोधत होते. तेव्हा मला ड्रॉवरमध्ये एक मोबाइल सापडला.  तो १९ वर्षांपूर्वी विकत घेतलेला होता. हा फोन माझ्याकडे होता हे विसरून गेलो होतो. तो कधी चार्ज केला होता, हे आता आठवतही नाही. तर शास्त्रज्ञांनी सांगितले नोकियाने मोबाइल फोन तयार करण्याऐवजी रिनिव्हल एनर्जी तयार केली केली होती. नोकियाचे हे मॉडेल २००० मध्ये लाँच झाले. कंपनीचे आजवरचे सर्वात यशस्वी मॉडेल ठरले. हा मोबाइल टिकाऊपणामुळे जगभरात प्रसिद्ध झाला. म्हणूनच कंपनीने गेल्या वर्षी याचे नवे माॅडेल लाँच करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...