Home | National | Delhi | 19 years old girl had stolen child in Delhi

19 वर्षीय मुलीच्या मनात आला आई बनण्याचा विचार, त्यासाठी निवडला चुकीचा मार्ग...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 10, 2019, 12:01 AM IST

मुलीने पोलिसांना सांगितले गुन्हा करण्यामागचे कारण.

 • 19 years old girl had stolen child in Delhi

  नवी दिल्ली- मुलाच्या हव्यासापोटी 19 वर्षीय मुलीने लहान मुळ चोरले. ते मुल तिने रस्त्यच्या किन्याऱ्यावर आपले मुल पाळणाऱ्या महिलेकडून. मागच्या महिन्यात संसद मार्गाच्या परिसरात 19 वर्षीय मुलगी लहान बाळाला चोरून घेऊन गेली. पोलिसांनी त्या मुलीला आणि बाळाला शोधून काढले आणि बाळाच्या आईकडे सुपूर्द केले. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपी सपना(19) आणि अजीत सिंह(45) यांना ताब्यात घेतले आहे. अजीतच्या पत्नीचे निधन झाले आहे, त्यामुले मुलीला त्याच्यासोबत राहायचे होते आणि त्यामुळेच तिने बाळाला चोरल्याचे कबुली दिली.


  चोरी करताना लोकांनी पाहिले
  डीसीपी नवी दिल्ली डिस्ट्रिक मधुर वर्मा यांनी सांगितले की, 2 जानेवारीला पुजा नावाच्या महिलेने बाळ हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली होती. तिने सांगितले की, बाळ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब आहे, आणि ती त्याला शोधत आहे. त्यानंतर न मिळामुले तिने पोलिसांद तक्रार दाखल केली. इंस्पेक्टर मनोज कुमार, एएसआय बख्शीश सिंह आणि कॉंस्टेबल हेमंत यांच्या टीमने मुलाची शोधाशोध सुरू केली. त्यात कळाले की बाळाला फुटपाथवरून युवतीने उचलून नेले आहे. ती जेव्हा बाळाला घेऊन जात होती तेव्हा अनेक लोकांनी तिला पाहिले.


  1 महिन्यांपूर्वी अमृतसरमध्ये झाली होती भेट
  सुत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी आरके आश्रममधून सपनाला पोलिसांनी पकडले, तिला रिमांडवर घेऊन चौकशी करण्यात आली. तिने सांगितले की, तिने बाळाला फिरोजपूर पंजाबमध्ये अजीतकडे ठेवले आहे. त्यानंतर पोलिसांनी अजीतलाही अटक केले. तेथून बाळ मिळाले आणि त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपीच्या पत्नीचे 8 वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि त्याला मुलबाळ नव्हते. महिन्याभरापूर्वी सपना आणि अजीतची ओळख झाली होती आणि त्यांनी सोबत राहण्याचे ठरवले होते. सध्या दोघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Trending