Home | Maharashtra | Mumbai | 19 Years Young Girl Mysterious Death in Sindhudurg

सिंधुदुर्गात 19 वर्षीय अंकिताच्या मानेचा तोडला लचका..खून की हिंस्र प्राण्याचा तिच्यावर हल्ला?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 08, 2019, 06:01 PM IST

अंकिता गुरुवारी रात्री लाकडे गोळा करण्यासाठी जवळच्या जंगलात गेली होती.

  • 19 Years Young Girl Mysterious Death in Sindhudurg

    सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याच्या पोंभुर्ले गावात एका 19 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. अंकिता पवार असे मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, अंकिताच्या मानेचा लचका तोडण्यात आला आहे. त्यामुळे तिचा खून करण्यात आला की हिंस्र प्राण्याने तिच्यावर हल्ला केला. याबाबत शंका उपस्थित होत आहेत.

    गुरुवारी रात्री अंकिता लाकडे गोळा करण्यासाठी जवळच्या जंगलात गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तिचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेहाभोवती रक्ताचा सडा पडला होता, तर आजूबाजूच्या झाडावरही रक्त पडलेले होते. एखाद्या हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, वन विभागाने याबाबतची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे अंकिताचा खून करण्यात आला का? याबाबतही तपास सुरू आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.

Trending