आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाराती रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिवाळीत सुटी न घेता 5 दिवसांत केल्या 191 प्रसूती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजाेगाई -हक्काच्या दिवाळीच्या सुट्या असतानाही सामाजिक भान जागृत ठेवत स्वाराती रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील डॉक्टरांनी आपली दिवाळी रुग्णांसोबत साजरी करत रुग्णांना रुग्णसेवा दिली. या दिवाळीच्या पाच दिवसांच्या कालावधीत ६४ महिलांचे सिझर व १२७ महिलांची प्रसूती केली. दोन अत्यवस्थ महिलांची शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यात आले. ही सर्व कामगिरी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  


दिवाळीचा सण व सुट्या हे सर्वांसाठी समीकरण दृढ झालेले आहे. आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात अनेकजण धन्यता मानतात. मात्र, स्वा.रा. ती. रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागातील डॉक्टरांनी आपल्या संवेदना जागृत ठेवून रुग्णसेवेला प्राधान्य दिले. दिवाळीच्या कालावधीत अंबाजोगाई शहर व परिसरातील तालुक्यांमध्ये खासगी दवाखाने बंद राहिले. हा सर्व भाग स्वा. रा. ती. रुग्णालयांवरच पडला. अशा स्थितीत सहा रुग्णसेवा महत्त्वाची समजून या विभागातील डॉक्टरांनी स्वत:च्या हक्काच्या सुट्या सोडून दिल्या व रुग्णालयात या सहा कालावधीत ६४ महिलांचे सिझर, १२७ महिलांची प्रसूती, तर दोन अत्यवस्थ महिलांच्या अवघड सहा शस्त्रक्रिया केली.  सुटीच्या कालावधीत डॉक्टरांनी केलेली ही कामगिरी गौरवास पात्र ठरली आहे.

 

या कामगिरीसाठी डॉ. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वात डॉ. मिताली गोलेच्छा, डॉ. वर्षा करपे, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. कल्याणी मुळे, डॉ. पूनम देसाई, डॉ. अर्चना पारसेवार, डॉ. प्रियंका खरोने, डॉ. सिद्धार्थ नामपल्ले, डॉ. प्रियंकासिंह दासिला, डॉ. अभिजित पाटील, डॉ. पुष्पदंत रुग्णे, डॉ. गौरव पुरळकर, डॉ. सुभाष राठोड, डॉ. करमजित डोंगरेंसह कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून रुग्णसेवेला प्राधान्य दिले. डॉक्टरांनी दाखवलेल्या या उपक्रमाबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांनी स्वागत केले आहे.

 

दहा डाॅक्टरांच्या प्रयत्नांना यश
दहा निवासी डाॅक्टरांच्या सहकार्यामुळे शस्त्रक्रिया करणे शक्य झाले अाहे. साेमवार ते शनिवार दिवाळीचा उत्सव असल्याने िनवासी डाॅक्टरांना २४ तास काम केल्यानंतर १२ तासांची सुटी देण्यात अाली. त्यामुळे २४ तासांच्या वेळेमुळे या शस्त्रक्रिया करणे शक्य हाेऊ शकले . अशा अडचणी लक्षात घेता  प्रशासकीय पातळीवर सुट्याही रद्द केल्या हाेत्या.
- डाॅ. सिद्धेश्वर बिराजदार, अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...