ऑस्कर विश्लेषण / सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या शर्यतीत राहिलेल्या '1917' 'ने 10 पैकी तीन अवॉर्ड जिंकले, सर्वाधिक नॉमिनेटेड' जोकर'ला दोन ऑस्कर

hollywoodreporter.com चे  चित्रपट लेखक स्कॉट फिनबर्ग आणि चित्रपट समीक्षक टॉड मॅकार्थी यांनी ऑस्कर विनिंग प्रेडिक्शन प्रसिद्ध केले होते. hollywoodreporter.com चे चित्रपट लेखक स्कॉट फिनबर्ग आणि चित्रपट समीक्षक टॉड मॅकार्थी यांनी ऑस्कर विनिंग प्रेडिक्शन प्रसिद्ध केले होते.
ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी

  • सर्वोत्कृष्ट कामगिरी- 'पॅरासाइट'ला 6 नॉमिनेशनपैकी चार अवॉर्ड मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर जिंकून इतिहास रचला
  • सर्वात वाईट कामगिरी - 'द आयरिशमॅन'ला 10 नामांकने मिळाली होती. दिग्गजांनी वर्णी असलेल्या या चित्रपटाला एकाही पुरस्कार मिळाला नाही.

दिव्य मराठी वेब टीम

Feb 11,2020 11:45:00 AM IST

हॉलिवूड डेस्कः 'पॅरासाइट' या दक्षिण कोरियन चित्रपटाने 92 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकून इतिहास रचला. 92 वर्षात प्रथमच ऑस्करमध्ये नॉन इंग्लिश चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडले गेले. त्याच वेळी, रेनी झेलवेगर आणि जोकिन फिनिक्स यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. याव्यतिरिक्त, ब्रॅट पिट आणि लॉरा डर्न यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेते म्हणून निवडले गेले.


क्रिटिकने '1917' या चित्रपटाला मोठे प्रतिस्पर्धी म्हटले होते...


hollywoodreporter.com चे चित्रपट लेखक स्कॉट फिनबर्ग आणि चित्रपट समीक्षक टॉड मॅकार्थी यांनी ऑस्कर विनिंग प्रेडिक्शन प्रसिद्ध केले होते. त्यांच्या मते सॅम मेंडिसच्या '1917' या चित्रपटाचा पगडा होता. त्याशिवाय क्विंटन टॅरॅेंटिनो दिग्दर्शित 'वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड' हा चित्रपटदेखील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरु शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. पण मास्टर डायरेक्टर बोंग जून हो यांच्या 'पॅरासाइट'ने पुरस्कार जिंकून इतिहास रचला.

चित्रपट लेखक स्कॉट फिनबर्ग यांनी सेरेमनीनंतर केलेल्या विश्लेषणामध्ये ‘पॅरासाइट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवल्याने थोडेसे आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, अकादमीमध्ये एकूण 8469 सदस्य ऑस्कर पुरस्कार ठरवितात. त्यापैकी अधिक संख्या ही वयस्कर अमेरिकन यांची आहे. ते खूप हुशार आहेत. कधीकधी त्यांची निवड आश्चर्यचकित करते आणि कधीकधी आम्हाला आनंदित करते. रविवारी 92 वा अकादमी पुरस्कार पाहून मला 1949 च्या पहिल्या नॉन अमेरिकन 'हॅमलेट'ची आठवण होते. त्यादिवशी असेच आनंदी आणि खिन्न आवाज ऐकू आले होते. पण, जेव्हा मी 2020 मध्ये बेस्ट पिक्चर म्हणून पहिला नॉन-इंग्रजी भाषेचा विजेता म्हणून कोरियन फिल्म 'पॅरासाइट'ला पाहतो तेव्हा असे दिसते की हॉलिवूडचे उच्चभ्रू सदस्य खरोखरच त्यांच्या पायावर उभे आहेत आणि चित्रपटाची जोरदार जयजयकार करीत आहेत.


प्रेक्षकांच्या पसंतीच्या 'जोकर' आणि 'द आयरिश मॅन'ची निराशा


डीसी कॉमिक्सच्या पात्रावर आधारित टॉड फिलिप्स दिग्दर्शित 'जोकर'ने 11 नामांकन प्राप्त केले होते, परंतु चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि ओरिजिनल स्कोअरसाठी केवळ दोन पुरस्कार मिळाले. याशिवाय सर्वाधिक निराशा नेटफ्लिक्स स्टुडिओच्या 'द आयरिशमॅन'च्या वाट्याला आली. अल पचीनो, रॉबर्ट डी निरो आणि जो पेस्कीसारख्या कलाकारांनी सजलेल्या या चित्रपटाला दहा नामांकनानंतर एकही पुरस्कार मिळवता आला नाही.

बोंग जूनच्या 'पॅरासाइट' ने सर्वांना चकित केले


ऑस्कर 2020 मधील सर्वात आश्चर्यकारक चित्रपट होता 'पॅरासाइट'. 6 श्रेणींमध्ये नामांकन मिळाल्यानंतर चित्रपटाने चार पुरस्कार जिंकले आहेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट अशा दोन मोठ्या श्रेणींसह या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पुरस्कार आपल्या नावी केले. त्याच वेळी, नामांकनाच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या क्विंटन टॅरेंटिनोच्या 'वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड'ला अवघे दोन पुरस्कार मिळाले. याच चित्रपटासाठी ब्रॅड पिटने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर मिळवला. ब्रॅट पिटने आपल्या करिअरमध्ये प्रथमच अभिनयासाठी ऑस्कर जिंकला.


वॉर फिल्म '1917' दुस-या स्थानावर

'1917' या वॉर चित्रपटाने 'पॅरासाइट'नंतर उत्कृष्ट कामगिरी केली. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब जिंकणा-या '1917' ने केवळ तीन ऑस्कर जिंकले. चित्रपटाला 10 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. याशिवाय 'मॅरेज स्टोरी' आणि 'जोजो रेबिट' यांना प्रत्येकी एक ऑस्कर मिळाला.

X
hollywoodreporter.com चे  चित्रपट लेखक स्कॉट फिनबर्ग आणि चित्रपट समीक्षक टॉड मॅकार्थी यांनी ऑस्कर विनिंग प्रेडिक्शन प्रसिद्ध केले होते.hollywoodreporter.com चे चित्रपट लेखक स्कॉट फिनबर्ग आणि चित्रपट समीक्षक टॉड मॅकार्थी यांनी ऑस्कर विनिंग प्रेडिक्शन प्रसिद्ध केले होते.
ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादीऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी