आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी परिसरात जलवितरण, ड्रेनेजसाठी १९२ कोटींचा आराखडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील स्मार्ट सिटी परिसरातील १०६४ एकर (एबीडी) भागातील जलवितरण व्यवस्था सुधारण्यासाठी १९२ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. रोज पाणीपुरवठा करणे, जुनी ड्रेनेज लाइन बदलणे आदी कामांचा समावेश आहे. २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी आराखडा तयार करून शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. यामुळे पुढील वर्षात शहरात खोदाईचे काम स्मार्ट सिटी एरियात दिसणार आहे. 


स्मार्ट सिटी एरियात जलवितरण व्यवस्था सुधारणे आणि २४ तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट आहे. यात जुनी ड्रेनेज लाइन बदलणे, दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची खबरदारी घेणे आदींचा समावेश आहे. काही भागात प्रायोगिक तत्त्वावर रोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हळूहळू स्मार्ट सिटी एरियात रोज पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. स्मार्ट सिटी एरियातील जलवाहिनी बदलण्यासाठी तांत्रिक बाजूंवर काम करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी एरियात १९२ कोटींचे काम तर शहराच्या इतर भागात अमृत योजनेतून ३०० कोटींची कामे करून जलवितरण व्यवस्था सुधारून रोज पाणीपुरवठ्याचा प्रयत्न आहे. 


गृहपाठ पूर्ण, पाच महिन्यांत कामे दिसतील 
स्मार्ट सिटी कंपनीचा गृहपाठ झाला आहे. पाच ते सहा महिन्यांत स्मार्ट सिटीत कामे दिस्ू लागतील. बैठकीत सुमारे ४८० कोटी रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली. पुढील वर्षात शहरात सर्वत्र खोदकाम सुरू होईल. लोकसभा निवडणूक असली तरी त्यापूर्वी मंजूर झालेली कामे सुरू असतील. स्मार्ट सिटीत पाण्याच्या विषयास प्राधान्य असणार आहे.

- असीम गुप्ता, चेअरमन, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी 

बातम्या आणखी आहेत...