आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

73 वर्षांपासून लेकमध्ये दडले होते हे रहस्य, बाहेर काढल्यानंतर लागली कोट्यवधींची बोली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिसः लेकच्या तळाशी तब्बल जेव्हा 73 वर्षे जुनी एक कार मिळाली, तेव्हा सगळेच हैराण झाले होते. कारण जेव्हा या कारचा लीलाव झाला, तेव्हा त्यावर कोट्यवधींची बोली लागली होती. 1925 च्या विंटेज बुगाती कारची ती पुर्णपणे उद्धवस्त झाल्यानंतरही एवढी किंमत लागली होती. याची खरेदी करणा-याने ही कार आता एका म्युझियममध्ये ठेवली आहे. 

 

73 वर्षांपासून पाण्यात बुडाली होती ही कार...
- ही कार कार इटली आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर असलेल्या मॅग्गियोरे लेकमध्ये 2009 मध्ये आढळली होती. 73 वर्षांपासून ही कार पाण्यातच होती. 
- ही कार 1925 विंटेज बुगाती टाइप 22 असून त्याला ब्रेस्किया रोडस्टर या नावानेही ओळखले जाते. यामध्ये 4 सिलेंडर आणि 1.5 लीटरचे इंजिन आहे. याचा वेग 100 कि.मी प्रती तासच्या जवळपास आहे.
- ही कार ऑफिशियली फ्रान्सच्या एका पत्त्यावर रजिस्टर्ड होती आणि ही 1935 मध्ये लेकमध्ये बुडाली होती. ही कार लेकमध्ये बुडण्यामागेही एक कहाणी आहे. 

 

कार बुडण्याची कहाणी...
- असे म्हटले जाते की, ग्रँड प्रिक्स मोटर रेसिंगचे शौकीन होते. ते या कारचे मालक होते. पण 1934 मध्ये पोकर गेमध्ये ते स्विस प्लेबॉय एडलबर्ट बोडेकडून हरले आणि त्यांना बुगाती त्यांना द्यावी लागली.

- स्थानिकांच्या दाव्यानुसार, त्यानंतर एडलबर्ट ही कार स्वित्झर्लंडबाहेर घेऊन जाऊ इच्छित होते. पण कारचा महागडा इम्पोर्ट टॅक्स देण्यात ते अयशस्वी ठरले. 
- त्यामुळे त्यांनी कीह कार स्विर अधिका-यांच्या स्वाधीन केली आणि या कारसोबत तुम्हाला जे करायचे ते करा, अशी परवानगी दिली.
- स्विस अधिका-यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी ही कार लेकमध्ये टाकली आणि ती कार लेकच्या तळाशी पोहोचली. त्यानंतर डायव्हर उगो पिल्लन यांनी या कारचा सांगाडा बघितल्यानंतर1967 साली या कारचा शोध लागला होता.

- स्थानिक लोकल डाइव क्लबला रेस्क्यू करुन ही कार बाहेर काढण्यासाठी 40 वर्षांचा काळ लागला. क्लबने यूथ व्हायलन्सविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि चॅरिटी फंड जमवण्यासाठी या कारचा लीलाव करण्याचा निर्णय घेतला.  

 

2 कोटी 70 लाख रुपये एवढी लागली कारची बोली...
- कारला पॅरिसच्या रेट्रोमोबाइलमध्ये बोनहाम्स ऑक्शनमध्ये ठेवण्यात आले आणि जानेवारी  2010 मध्ये कॅलिफोर्नियाचे मुलिन ऑटोमोटिव्ह म्युझियमचे मालक ओनर पीटर मुलिन यांनी 2 कोटी 70 लाखांची बोली लावून ही कार खरेदी केली. आता ही कार ओनर यांच्या मुलिन ऑटोमोटिव्ह म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे. लेकमधून ज्या अवस्थेत ही कार काढण्यात आली, त्याच अवस्थेत तिला म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहे.  

बातम्या आणखी आहेत...