आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: खंडणीसाठी दिल्‍लीहून आलेल्‍या दोन अभियत्‍यांना अटक, आई-मुलीच्‍या अपहरणाची दिली होती धमकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शहरातील वाकड परिसरात खंडणीची रक्‍कम वसुल करण्‍यासाठी आलेल्‍या दोन आरोपी अभियंत्‍यांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. दोन्‍ही अभियंतेे दिल्‍लीतील गुडगावमध्‍ये एका कंपनीत एकत्र काम करतात. अगदी हॉलीवूड स्‍टाईलमध्‍ये सुटाबुटात खंडणीची रक्‍कम घेण्‍यासाठी ते पुण्‍यात आले होते. खंडणी न दिल्‍यास महिला व तिच्‍या मुलीचे अपहरण करण्‍यात येईल, अशी धमकी आरोपींनी दिली होती.

 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, वाकड परिसरात राहणा-या एका महिलेला दोन आरोपींनी फोन करून 5 लाख रूपयांची खंडणी मागितली होती. फोनवर आरोपींनी महिलेला तिच्‍या कुटुंबीयांबद्दल बरीच बारीकसारीक माहिती सांगितली होती. तसेच खंडणी न दिल्‍यास महिला व तिच्‍या मुलीचे अपहरण करण्‍यात येईल, अशी धमकीही त्‍यांनी दिली होती. यामुळे प्रचंड घाबरलेल्‍या महिलेने ताबडतोब पुणे पोलिसांकडे धाव घेत याची तक्रार दिली. नंतर पोलिसांनी सांगितल्‍यानूसार, महिलेने आरोपींना खंडणीची रक्‍कम घेण्‍यासाठी पुण्‍याला बोलावले.


खंडणीसाठी दिल्‍लीहून आले आरोपी
महिलेने आरोपींना पुणे एअरपोर्टवर बोलावले होते. त्‍यानूसार पोलिसांनी एअरपोर्टवर सापळा रचला. येथे आरोपींना पैशांची बॅग सोपावताच साध्‍या वेशात असलेल्‍या पोलिसांनी त्‍यांना रंगेहाथ पकडले. अटक करण्‍यात आलेल्‍या युवकांचे नाव रोहित विनोद यादव आणि अभिनव सतिश मिश्रा असे आहे. दोघेही बीटेक इंजीनिअर असून गुडगावच्‍या आयटी पार्कमध्‍ये नोकरीला आहेत. दोघेही चक्‍क दिल्‍लीमधून खंडणीची रक्‍कम वसूल करण्‍यासाठी पुण्‍याला आले होते.


अशी मिळवली कुटुंबाविषयी माहिती
पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्‍त आरके पद्मानाभन यांनी सांगितले की, 'दोन आरोपींपैकी एक रोहित यादव यापूर्वी काही काळ पुण्‍यात राहिलेला आहे. महिला ज्‍या सोसायटीत राहते, त्‍याच सोसायटीत रोहितचा एक मित्र राहत होता. अनेकदा आपल्‍या मित्राला भेटण्‍यासाठी रोहित त्‍या सोसायटीत जात असे. याचदरम्‍यान त्‍याने या कुटुंबाविषयी माहिती मिळवली. नंतर फेसबुकवरून महिलेचा मोबाईल नंबर मिळवत त्‍याने खंडणीसाठी महिलेला तिच्‍या मुलीच्‍या अपहरणाची धमकी दिली.   

 

बातम्या आणखी आहेत...