Home | National | Other State | 2 boys attacked with sharp weapon and killed a school going girl

शाळेत जाणाऱ्या मुलीवर हल्ला करून आरोपी झाले पसार, कोणीच केली नाही मदत, अर्धा तास तडफडून सोडला अखेरचा श्वास...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 04:15 PM IST

रक्ताने माखलेली मुलगी अर्धा तास पडली होती रस्त्यावर

  • कांकेर(छत्तीसगढ)- एका 10 वीत शिकणाऱ्या मुलीवर एका माथेफिरूने धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

    लोकांनी सांगितले की, एका माथेफिरूने मित्रासोबत मिळून तिच्यावर अनेक वार केले, त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर ते दोघे भानुप्रतापपूरकडे पळून गेले. या घटनेनंतर अर्ध्या तासानंतर पोलिस तेथे आले तोपर्यंत त्या मुलीने प्राण सोडले होते. या हल्यामागे प्रेमप्रकरण असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Trending