Home | International | Other Country | 2 Boys Got Inside The Haunted Abaondened in Russia

डोंगरावर फिरताना 2 मित्रांना दिसला गुप्त दरवाजा, आत जाऊन पाहिल्यावर दिसले भयंकर दृश्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 22, 2018, 12:51 PM IST

रशियामध्ये दोन मित्रांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान वापरण्यात आलेले एक गुप्त भुयार शोधून काढले.

 • 2 Boys Got Inside The Haunted Abaondened in Russia

  रशिया - रशियामध्ये दोन मित्रांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान वापरण्यात आलेले एक गुप्त भुयार शोधून काढले. हे 2 मित्र दक्षिणीकडे असलेल्या काही टेकड्यांवर ट्रेकिंगसाठी गेले होते. तेव्हा त्यांची नजर एका जुन्या दरवाजावर गेली. त्यांनी दार उघडल्यावर त्यांच्यासमोर एक भुयार दिसले. दोघांना कळून चुकले की, ही जुन्या काळातील एखादे महत्त्वाचे भुयार आहे. ते एवढे जर्जर झालेले होते की, कधीही कोसळू शकले असते. तरीही दोघांनी आत प्रवेश केला. आता गेल्यावर मात्र त्यांची भीतीनं गाळणच उडाली.

  भुयारात होते भयंकर दृश्य...
  - दोघेही या जुन्या भुयारात जसजसे आत जाऊ लागले तसतसा त्यांचा भयचकित करणाऱ्या गोष्टींशी सामना होऊ लागला. भुयाराचे तोंड आधीच जर्जर झालेले होते, आत जाण्यासाठी थोडीशीच जागा होती. दोघांना कल्पना होती की, ही खदान कधीही कोसळू शकते. तरीही दोघांनी आतमध्ये यशस्वीरीत्या प्रवेश केला. यानंतर जे दृश्य समोर आले ते भीतिदायक होते.

  - खाणीचा मार्ग पाण्याने भरलेला होता. येथे भीमकाय यंत्रे आणि एक रेल्वे ट्रॅकही बनलेला होता. दोघांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की, एका डोंगरामध्ये एवढे सगळे आहे. दोघेही आणखी पुढे गेल्यावर दिसले की, भिंतीवरून एक विचित्र केमिकलचा स्राव होत आहे. दोघांना कळून चुकले की, ही सोन्याची वा एखाद्या धातूची खाण आहे.

  मग दिसला गुप्त दरवाजा
  - काही अंतरावर गेल्यानंतर दोघांना एक भीमकाय दरवाजा दिसला. त्यामागे तेवढीच मोठी खोली होती. परंतु त्यासमोर पाणी साचलेले होते. दोघेही खूप पुढे निघून गेले होते. जवळूनच आणखी एक रस्ता होता, परंतु त्याचा शेवट दिसत नव्हता. तितक्यात त्यांना विचित्र जाणीव झाली. त्यांना काही आवाज ऐकू आले. दोघांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी ताबडतोब त्या जागेवरून परत जाण्याचा निर्णय घेतला.

  काहीतरी होते तेथे
  - दोघांनी या भीतिदायक खदानीत जीव धोक्यात घालून बराच वेळ घालवला आणि त्याचे अनेक फोटोग्राफ घेतले. एक जण म्हणाला, त्या भुयारात नक्कीच काहीतरी होते आणि ते खूप भयंकर दृश्य होते. त्या दारामागे नक्कीच काहीतरी भयंकर होते. तिथून विचित्र आवाजही येत होते. तर दुसरा मित्र म्हणाला की, कदाचित ते आवाज हवेमुळे येत असावेत. दोघांनी आपल्या या अनोख्या शोधाबाबत सोशल मीडियावर सांगितले.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, या भीतिदायक स्थळाचे आणखी Photos...

 • 2 Boys Got Inside The Haunted Abaondened in Russia
 • 2 Boys Got Inside The Haunted Abaondened in Russia
 • 2 Boys Got Inside The Haunted Abaondened in Russia
 • 2 Boys Got Inside The Haunted Abaondened in Russia
 • 2 Boys Got Inside The Haunted Abaondened in Russia
 • 2 Boys Got Inside The Haunted Abaondened in Russia
 • 2 Boys Got Inside The Haunted Abaondened in Russia
 • 2 Boys Got Inside The Haunted Abaondened in Russia

Trending