आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Building Fire: दिल्लीत चार मजली इमारतीला भीणष आग, 2 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीत मंगळवारी एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत दोन चिमुकले गंभीररीत्या होरपळले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. 6 वर्षांचा जैद आणि 7 वर्षांची आयशा अशी मृत्यूमुखी पावलेल्या मुला-मुलींची नावे आहेत. ही आग शाहीन बाग परिसरातील 4 मजली अबु फैजल एनक्लेव्ह येथे एका दुकानात लागली होती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास या रहिवासी इमारतीच्या एका दुकानात आग लागली. आग इतकी भडकली की दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट्सपर्यंत पोहोचली. यामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील एक मुलगा आणि मुलगी होरपळले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे 6 बंब बोलावण्यात आले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु, तोपर्यंत दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीप्रमाणे, ही आग बेसमेंटमध्ये असलेल्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने लागली होती. आग लागली त्यावेळी इमारतीमध्ये किती लोक होते हे अद्याप स्पष्ट नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, दीड महिन्यांपूर्वीच दिल्लीच्या करोल बाग येथे इमारतीला भीषण आग लागली होती. त्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

बातम्या आणखी आहेत...