Home | Maharashtra | Mumbai | 2 crore people 50 thousand crores rupees in fraud plan

दोन कोटी लोकांचे 50 हजार कोटी रुपये फसव्या याेजनेत, न्याय कधी मिळणार, गुंतवणूकदार संघटनेचा सवाल 

प्रतिनिधी | Update - Feb 08, 2019, 09:25 AM IST

पाँझी स्किममध्ये (फसव्या योजना) झटपट पैसे दुप्पट हाेण्याच्या आमिषापोटी सर्वसामान्यांपासून अनेक श्रीमंतांनीही लाखो रुपये

  • 2 crore people 50 thousand crores rupees in fraud plan

    मुंबई - पश्चिम बंगालमधील शारदा चिट फंड घाेटाळ्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, अशा प्रकारच्या एकूण १९७ फसवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये देशभरातील ६ काेटींपेक्षा जास्त नागरिकांचे १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे अडकलेले अाहेत. यात महाराष्ट्रातील २ काेटी गुंतवणूकदारांच्या ५० हजार कोटी रुपयांचाही समावेश आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळून न्याय मिळणार का, असा सवाल गुंतवणूकदार संघटनांनी केला अाहे.


    पाँझी स्किममध्ये (फसव्या योजना) झटपट पैसे दुप्पट हाेण्याच्या आमिषापोटी सर्वसामान्यांपासून अनेक श्रीमंतांनीही लाखो रुपये गुंतवले. परंतु या योजना चालवणाऱ्या अनेकांनी त्यांची घोर फसवणूक केली. पाँझी याेजना राबवणाऱ्या कंपन्या देशपातळीवरील असल्या तरी महाराष्ट्रातही त्यांची कार्यालये अाहेत. या १९७ कंपन्यांवर भांडवल बाजार नियंत्रक 'सेबी'ने बंदी घातली अाहे. या कंपन्यांच्या मालमत्ता विकून त्याचे पैसे गुंतवणूकदारांना मिळवून देण्यात सेबी नियंत्रकांची भूमिका अद्यापही स्पष्ट नसल्याचे इन्व्हेस्टर फाेरम चॅरिटेबल ट्रस्ट या गुंतवणूकदारांच्या हिताविराेधात लढणाऱ्या संघटनेचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी म्हटले आहे.


    सहारा प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे अादेश दिले हाेते. सहाराच्या लव्हासा, अॅम्बे व्हॅली येथील मालमत्तांवर टाचदेखील अाणली. परंतु या मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे अद्याप परत मिळालेले नाहीत. केवळ सहाराच नाही तर अन्य फसवणूक करणाऱ्या कंपन्यांबाबतही हीच स्थिती अाहे. पॅनकार्ड क्लब कंपनीच्या फसवणूक प्रकरणात 'सेबी'च्या कार्यालयावर माेर्चा काढण्यात अाला. परंतु त्यानंतरही पुढे काेणतीच कार्यवाही झालेली दिसून येत नाही, असा अाराेप उटगी यांनी केला.

Trending