आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात २ दिवस दमदार पाऊस; लातूर जिल्ह्यात १० मंडळात अतिवृष्टी, नांदेड जिल्ह्यात ३५.१९ मिमी पावसाची नोंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुयार चिंचोली येथील मतदान केंद्र असलेल्या शाळा परिसरात असे पाणी साचले होते. - Divya Marathi
भुयार चिंचोली येथील मतदान केंद्र असलेल्या शाळा परिसरात असे पाणी साचले होते.

लातूर - पावसासाठी तहानलेल्या लातूर जिल्ह्यात रविवारी रात्री दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील दहा मंडळांत अतिवृष्टी झाली. तर अनेक मंडळांत ६० मिमीहून अधिक पाऊस झाला. यामुळे नाले, ओढ्यांना अचानक पाणी आले. वाढवण्यात एका घराची भिंत कोसळून राम शिंदे आणि त्यांचा मुलगा सचिन  या बाप-लेकांना जीव गमवावा लागला. एकीकडे ही परिस्थिती असताना या पावसामुळे लातूर आणि औसा या दोन तहानलेल्या तालुक्यांना या पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे. यंदा पाऊसच न पडलेल्या या परिसरात सोमवारी पहाटे पडलेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पिकांची आशा पल्लवित होण्यासह नदीला पाणी वाहिले आहे. 

या मंडळांत झाली अतिवृष्टी
औसा तालुक्यातील औसा ८० मिमी, मातोळा ९४, उदगीर तालुक्यातील हेर १४०, वाढवणा १२८, नळगीर १४५, अहमदपूर तालुक्यातील खंडाळी ७२, हाडोळती ७४, चाकूर तालुक्यातील शेळगाव १४४, जळकोट तालुक्यातील घोणसी १९९, जळकोट १३५ मिमी पाऊस झाला. 
 

परभणी : सलग दुसऱ्या दिवशी २० मिमी पाऊस

परभणी | शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी दिवसभर खंड दिल्यानंतर रात्री पुन्हा जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात २०.८ मिमी पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक पालम तालुक्यात ४८ तर पूर्णेमध्ये ३५.२० मिमी पाऊस झाला. 

परतीचा पाऊस अनपेक्षितपणे दोन दिवस जोरदार झाला. जवळपास ६५ मिमी झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील नदी, नाले, ओढ्यांना पाणी तर आलेच मात्र रस्त्याची अवस्था अधिकच दयनीय झाली. रविवारी दिवसभर थांबलेला पाऊस पुन्हा रात्री प्रकटला. सकाळपर्यंत भुरभुर सुरूच होती. परिणामी सकाळी पहिल्या दोन तासांत मतदार केंद्राकडे फिरकलेच नाहीत. शहरातील केंद्राच्या परिसरात दलदलमय परिस्थिती झाली होती, तर ग्रामीण भागात केंद्रापर्यंत पोहोचताना मोठी कसरत करत मतदान करण्याची वेळ आली. याचाच परिणाम काही ग्रामीण केंद्रावर दुपारनंतरच मतदान झाले. 

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सोमवारी सकाळी ओसरला. त्यानंतर उघडीप दिली तरी ढगाळ वातावरण होते. परभणीत १०.७६, गंगाखेडमध्ये २६.५०, सोनपेठमध्ये ३४, सेलू ४.८०, पाथरी १३.३३, मानवत ७.८७ तर जिंतूरमध्ये नाममात्र ०.५० मिमी पाऊस झाला. या पावसाने ६६२.९८ मिमीचा आकडा गाठला आहे. एकूण टक्केवारी ८७.५ इतकी आजवरच्या पावसाची आहे. 
 
 

बातम्या आणखी आहेत...