आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 2 Dead Bodies Of Parents Carried On Shoulder In Gariaband

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधी आई-वडिलांचा खून नंतर खांद्यावर न्यावे लागले मृतदेह, मुले पळाली म्हणून वाचला जीव, शेजाऱ्यांनी दिला आधार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरियाबंद(छत्तीसगढ)- राज्याच्या या ग्रामीण भागात विकास दूर-दूर पर्यंत दिसत नाही. या गावात रस्तादेखील नाहीये. येथे एका दाम्पत्याची गुंडानी हत्त्या केली. मृतदेहांचे पोस्टमार्टम होने बाकी होते, त्यासाठी मृत दाम्पत्याच्या मुलांनी आई-वडीलांचे मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने खांद्यावर टाकून पोस्टमार्टमसाठी नेले, आणि परत वापस खांद्यावरच आणले. त्यांना अंदाजे 4 किलोमीटर चालावे लागले.

 

कुऱ्हाडीने केली हत्त्या
- गुंडांनी एका दाम्पत्याची रात्री कुऱ्हाडीचे वार करून हत्त्या केली. सोबत झोपलेल्या मुलांनी पळ काढला म्हणून त्यांचा जीव वाचला. त्यानंतर पोस्टमार्टमसाठी मृतदेह नेण्याचे काम पोलिसांचे होते पण त्यांच्या हलगर्जीपणामुळे गावातील लोकांनाच मृतदेह न्यावे लागले.