आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका फ्रेममध्ये दिसली दीपिका-प्रियांकाची स्पेशल बॉन्डिंग, दुसरीकडे गोविंदाच्या खांद्यावर रेस्ट करताना दिसला रणवीर, रेखापासून उर्मिलापर्यंत सर्व सेलेब्रिटी दिसले निकयांकाच्या रिसेप्शनमध्ये - 15 Unseen Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने बॉलिवूड फ्रेंड्ससाठी गुरुवारी हॉटेल ताज लैंड्स एंडमध्ये रिसेप्शन होस्ट केले होते. पीसीच्या रिसेप्शनमधील अनसीन इनसाइड फोटोज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. फोटोमध्ये दीपिका-प्रियांका एका फ्रेममध्ये स्पेशल बॉन्डिंग शेयर करताना दिसले. दोघींसोबत या फोटोमध्ये रणवीरही होता. तिघांनी सोबत केवळ डान्सच नाही केला तर खूप पोजही दिल्या. नंतर गोविंदा सोबतही वेळ घालवला. दोघांचा एक फोटो आहे ज्यामध्ये रणवीर, गोविंदाच्या खांद्यावर रेस्ट करताना दिसत आहे. रिसेप्शनच्या इनसाइड फोटोजमध्ये बॉलिवूडचे कलाकार उर्मिला मातोंडकर, रेखा, अंकिता कंवर, अनुपम खेर, आशा भोसले यांच्यासह अनेक सेलिब्रिटी पाहायला मिळाले. 

 

प्रियांकाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले 2 Ex- बॉयफ्रेंड पण नाही आले 3...
- प्रियांकाच्या रिसेप्शनमध्ये तिचे 2 एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूर आणि हरमन बावेजा सामील झाले होते. पण पीसीचे 3 आणखी एक्स बॉयफ्रेंड पार्टीमध्ये दिसले नाहीत. 
- प्रियांकाच्या मॉडेलिंगच्या दिवसांत बॉयफ्रेंड असलेला अभिनेता असीम मर्चेंट रिसेप्शनमध्ये दिसला नाही. जेव्हा 2000 मध्ये प्रियांका मिस वर्ल्ड बनली होती, तेव्हापासूनच दोघांमध्ये प्रेम असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. मात्र दोन वर्षानंतर दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले. असीम घटस्फोटित आहे आणि एका मुलीचा पिता आहे. बॉलिवूडमध्ये केवळ 7-8 चित्रपटापर्यंतच त्याचे करियर होते.  
- प्रियांकाच्या रिसेप्शनमध्ये शाहरुख खान आणि अक्षय कुमार (दोघांसोबतही पीसीच्या लिंकअपची चर्चा झाली होती) सुद्धा नव्हते आले. प्रियांकाच्या रिसेप्शनमध्ये शाहरुखच्या न पोहोचण्याचे कारण त्याचा चित्रपट 'झिरो' ची स्क्रीनिंग सांगितले जाते आहे. पण चर्चा अशीही होते आहे की, शाहरुखने जाणूनबुजून प्रियांकाचे रिसेप्शन अवॉइड तर केले नाही ना. 
- गुरुवारी प्रियांकाचे रिसेप्शन होते आणि त्याच दिवशी शाहरुखची फिल्म 'झिरो' ची स्पेशल स्क्रीनिंग होती. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख कधीच स्क्रीनिंगमध्ये पूर्णवेळ थांबत नाही. पण 'झिरो' च्या स्क्रिनिंगमध्ये तो पूर्णवेळ थांबला होता.  
- अक्षय कुमारही येथे कुठेच दिसला नाही. सांगितले जाते आहे की, अक्षय लेट नाइट पार्टीज अवॉइड करतो. कदाचित हेच कारण असावे की तो रिसेप्शनला आला नाही. फिल्म 'अंदाज' च्या शूटिंगच्या दरम्यान प्रियांकाचे नाव लग्न झालेल्या अक्षय कुमारसोबत जोडले गेले होते. यावेळी अक्षय आणि त्याची पत्नी ट्विंकल यांच्यामध्ये कुरबुर झाल्याची चर्चाही मीडियामध्ये सुरु होती. मात्र त्यानंतर अक्षयने प्रियांकापासून अंतर ठेवले. 

 

निकयांकाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले हे सेलेब्रिटी.. 
निकयांकाच्या रिसेप्शनमध्ये सलमान खान व्यतिरिक्त दीपिका-रणवीर, कैटरीना कैफ, स्वरा भास्कर, परिणीती चोप्रा, राजकुमार राव आणि गर्लफ्रेंड पत्रलेखा, करन जौहर, कियारा आडवाणी, यामी गौतम, डाएना पेंटी, नवाज़ुद्दीन सिद्दीकी, दीया मिर्जा, सोफी चौधरी, कार्तिक आर्यन, हरमन बावेजा, जैकी भगनानी, डिनो मोरया, तनिषा मुखर्जी, गोविंदा, अनिल कपूर, अनुपम खेर, सतीश कौशिक, बॉबी देओल, पूजा हेगड़े, राज बब्बर, अमीषा पटेल, साउथची अभिनेत्री तमन्ना भाटिया, पत्नी प्रियांकासोबत विवेक ओबरॉय, रवीना टंडन, जायरा वसीम, रणधीर कपूर, कंगना रनोट रेखा, विद्या बालन, संजय दत्त यांच्यासह अनेक कलाकार सामील झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...