आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात पर्यटकांसाठी मुंबईत दोन तरंगती हॉटेल्स, केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अस्ताला चाललेल्या सूर्याने अासमंताने अाेढलेली पिवळी चादर, चारही बाजूने खवळणाऱ्या निळाशार समुद्राच्या लाटांचा अावाज साेडला तर निर्माण झालेली शांतता.. अशा वातावरणात रुचकर पदार्थांचा स्वाद घेत सागरी सफर करण्याची मजा काही वेगळीच. क्वीन्सलाइन नेव्हरलँड अाणि क्वीन्सलाइन वायएच या दाेन नव्या तरंगत्या हाॅटेलच्या माध्यमातून पर्यटकांना तारकांच्या साथीने रात्रीच्या जेवणाचा अास्वाद अाता थेट मुंबर्इच्या अरबी समुद्रात घेता येणार अाहे. एबी सेलेस्टियल, मुंबर्इ मेडन क्रुझनंतर या अाणखी दाेन नव्या तरंगत्या हाॅटेलची भेट पर्यटकांना मिळाली अाहे. विशेष म्हणजे या भव्य तरंगत्या हाॅटेलमध्ये एकाच वेळी ४७५ जणांना जेवणाचा अास्वाद घेता येऊ शकणार अाहे. केंद्रीय नाैकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी माझगाव या तरंगत्या हाॅटेलचे लाेकार्पण करण्यात अाले. 

राेजच्या धकाधकीच्या जीवनात मुंबर्इकरांना काहीतरी हटके अानंद देण्याबराेबरच पर्यटकांना सागरी सफरीचा अनाेखा अनुभव देण्यासाठी दिल्लीतील उद्याेजक पती-पत्नी मृदुल थिरानी अाणि श्रीप्रिया थिरानी यांच्या संकल्पनेतून 'क्वीन्सलाइन नेव्हरलँड' अाणि 'क्वीन्सलाइन वायएच' या दाेन तरंगत्या हाॅटेलची भेट मिळाली अाहे. थिरानी कुटुंबीयांनी ही तरंगती हाॅटेल तुर्कीमधून खरेदी केली. थिरानी कुटुंबीयांच्या मालकीच्या असलेल्या या हाॅटेलचे व्यवस्थापन राॅयल बाॅम्बे याच क्लब यांच्याकडे अाहे. मुंबर्इचा सागरी किनारा विकसित करण्याचा एक भाग म्हणून मुंबर्इ पाेर्ट ट्रस्टने अलीकडेच डाेमॅस्टिक क्रुझ टर्मिनसचे उदघाटन करून मुंबर्इ ते गाेवा क्रुझ सेवा सुरू केली.

 

असे जाता येईल 
पूर्व द्रूतगती महामार्गाजवळ पाेर्ट ट्रस्टने पर्यटकांसाठी पाच क्रमांकाच्या जेट्टी येथे नवीन प्रवेशद्वार सुरू केले अाहे. या जेट्टीवर अाल्यानंतर लहान बाेटीने जाता येईल. हे तरंगते हाॅॅटेल गेटवे अाॅफ इंडियापासून दाेन किमीवर अात समुद्रावर उभे अाहे.

 

समुद्रात तरंगत्या हाॅटेलची काही वैशिष्ट्ये 
अाेपन डेक, दाेन बार, बँक्वेट हाॅल असून प्रत्येक रेस्टाॅरंटमध्ये एकाच वेळी ४५० जणांना जेवणाची साेय आहे. इटालियन पास्तापासून ते बटर चिकनपर्यंत जगभरातील लज्जतदार पदार्थांचा अास्वाद हॉटेलमध्ये घेता येर्इल. बँक्वेट हाॅलमध्ये लग्न, साखरपुडा, पार्टी साेहळ्याचा अानंदाेत्सवदेखील साजरा करता येईल. बंद खाेलीएेवजी समुद्राच्या खुल्या वातावरणात लांबलचक डेकवर अाॅफिस मीटिंग, गेटटुगेदरदेखील करता येणार असल्याचे सांगण्यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...