आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 नराधमांनी 17 वर्षीय मुलीवर केला बलात्कार, 6 फूट उंच भिंतीवरून घुसले अन् आईजवळ झोपलेल्या मुलीला उचलून घेऊन गेले, गँगरेपनंतर घराबाहेर फेकून गेले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सनौली (पानिपत) - पानिपत, जिंद आणि यमुनानगरमध्ये शनिवारी पाशवी बलात्काराच्या दोन घटना घडल्या. पानिपतच्या सनौली परिसरातील एका गावात आईजवळ झोपलेल्या मुलीला किडनॅप करून 8 नराधमांनी शेतात नेले व तेथे सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी 17 वर्षीय पीडितेला घराबाहेर फेकून गेले. कुणालाही काहीही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी 6 जणांसह 2 अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी पोलिसांनी या किशोरवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून 2 आरोपी हे माजी सरपंचाच्या कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे.

 

मुलीने हिंमत गोळा करून आईला सांगितली घटना
पीडितेने हिंमत करून शुक्रवार दुपारी आईला आपबीती सांगितली. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यावर आरोपींच्या घरच्यांनी पीडितेचे घरी पोहोचून केस परत घेण्यासाठी दबाव टाकला. पीडितेचे कुटुंब प्रचंड घाबरले. आरोपींचे कुटुंबीय घरातून निघून गेल्यानंतर पीडितेच्या आईवडिलांनी थेट पोलिस ठाणे गाठून केस दाखल केली.

 

दुसरी घटना
दुसरीकडे, जिंदच्या जुलाना परिसरातील एका गावात 12वीच्या विद्यार्थिनीचे घरातून अपहरण करून 6 तरुणांनी बलात्कार केला. यानंतर हात-पाय बांधून व तोंडात बोळा कोंबून तलावात फेकून फरार झाले. पोलिसांनी अपहरण, गँगरेपसहित इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली आहे. 


आईजवळ झोपली होती, 6 फूट उंच भिंतीवरून उडी मारून घुसले आरोपी, घटनेनंतर घराबाहेर सोडले
सनौली पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीत पीडितेने सांगितले की, गुरुवारी रात्री ती कुटुंबीयांसोबत जेवण करून झोपली होती. रूममध्ये त्या चारही बहिणी आणि आई वेगवेगळ्या खाटेवर होत्या. दुसऱ्या खोलीत वडील झोपलेले होते. रात्री 11 वाजता गावातील दिलबाग हाशिम व इसरार इस्लाम घराची 6 फूट उंच भिंत ओलांडून रूममध्ये घुसले. दोघांनी तिचे तोंड दाबले आणि उचलून 1 किमी दूर असलेल्या शेतात नेले. तेथे गावातीलच कुर्बान अकबर, दिल्लू जमशाद, काला फियाज, सादा तालीम आणि इतर दोघे आधीपासून हजर होते. सर्वांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 2 तासांनंतर आरोपींनी तिला घराबाहेर फेकून दिले. शिवाय कुणालाही काहीही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.


बलात्कारानंतर आरडाओरड ऐकताच, पीडितेचे हात-पाय बांधून तलावात फेकले
जिंदच्या जुलाना परिसरातील एका गावात 16 वर्षीय पीडितेने सांगितले की, शुक्रवारी रात्री तिने आपल्या आईला मेंदी लावली होती. यानंतर दोघीही झोपी गेल्या. 11 वाजेच्या सुमारास गावातीलच दीपक व प्रवीणने तिचे अपहरण करून बाइकवरून तिला निर्मनुष्य जागेवर नेले. तेथे आधीपासूनच कपिल, छोटू, संजीव नसीब हजर होते. तेथे दीपक व प्रवीणने तिच्यावर आळीपाळीने रेप केला. तर इतरांनी छेडछाड व बलात्काराचा प्रयत्न केला. कुणीतरी येत असल्याचा आवाज ऐकल्यावर त्यांनी पीडितेच्या तोंडात बोळा कोंबला. हात-पाय कपड्याने बांधले आणि बुडून मरण्यासाठी तिला तलावात फेकून दिले. रात्रीतूनच तिचे कुटुंबीय शोध घेत-घेत तलावाजवळ पोहोचले आणि तिला बाहेर काढले. शनिवारी सकाळी कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचून याची तक्रार दिली. डीएसपी पुष्पा खत्री म्हणाल्या की, पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...