आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटणा : शेल्टर होममधील 2 मुलींचा मृत्यू, एक अल्पवयीन; पोलिस-प्रशासनाला 36 तासांनंतर मिळाली माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- उलटी-अतिसाराचा त्रास झाल्यानंतर शुक्रवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- रुग्णालय प्रशासनाने सांगितले- दाखल करण्यापूर्वीच झाला होता मृत्यू.

 

पाटणा - राजीवनगर परिसरातील आसरा शेल्टर होममध्ये राहणाऱ्या 2 मुलींचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक अल्पवयीन आहे. पोलिस आणि प्रशासनाला या घटनेची माहिती 36 तासांनंतर मिळाली. या मुलींना शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमधून नेण्यात आले होते. पाटणा मेडिकल कॉलेज (पीएमसीएच) चे अधीक्षक डॉ. राजीव रंजन म्हणाले की, दाखल केले जाण्यापूर्वीच या मुलींचा मृत्यू झालेला होता. एसएसपी मनू महाराज यांनी सांगितले की, फोनवर या घटनेची माहिती रविवारी सकाळी मिळाली. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर कारणांचा खुलासा होऊ शकेल. सध्या शेल्टर होमच्या 2 महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

 

मृतदेहांचे पोस्टमॉर्टम शनिवारी करण्यात आले आणि याची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नव्हती. यानंतर या घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शेल्टर होम व्यवस्थापनाने पोलिस-प्रशासनाला स्वत: माहिती दिली की, इतर माध्यमातून या घटनेचा खुलासा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

उलटी-अतिसाराच्या त्रासानंतर रुग्णालयात नेले: 
शेल्टर होमचा एक कर्मचारी म्हणाला की, शुक्रवारी उलटी, अतिसारानंतर दोन्ही मुलींना रात्री 10 वाजता पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दोघींचाही मृत्यू झाला.

 

शेल्टर होममधून पळून जाण्याचा प्रयत्न: 
ज्या रात्री दोन मुलींचा मृत्यू झाला, त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारीच 3 मुलींनी आसरा शेल्टर होममधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस आणि समाजकल्याण विभागाचे अधिकारीही शेल्टर होमची तपासणी करण्यासाठी गेले होते. शेल्टर होममध्ये जाणाऱ्या एका संस्थेच्या महिला कार्यकर्तीने सांगितले की, येथे मुलींसाठी सुविधा नाही. अनेक मुलींचे केसं कापण्यात आले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...