आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझरमध्ये 2 तास वाहतूक कोंडी; वाहनधारकांनकडून नियम धाब्यावर, अवजड वाहणे करताय रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रोडवरून प्रवास 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओझर- अपूर्ण असलेल्या ओझर येथील सहा पदरी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होऊन वर्ष उलटले, परंतु पर्यायी मार्ग करण्यात आलेल्या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कसरत करवी लागत आहे. येथील सर्व्हिस रोडचा वापर बस आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

ओझर गाव शहराकडे वाटचाल करत असतांना येथील वाढलेली वाहनांची संख्या बघता महामार्गाला लागून सर्व्हिस रोड देखील आहे. सध्या मेनगेट पासून ते धन्वंतरी हॉस्पीटलपर्यंत सर्व्हिस रोडचे काम प्रगतीपथावर आहेत. तसेच गडाख कॉर्नर ते पवार ऑटोपर्यंत पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. तर सायखेडा चौफली ते दहावा मैलापर्यंत दोन्हीं बाजुंनी सर्व्हिस रोड झाला आहे.

 

मूळ महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या कामांमुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी नित्याचीच बणली असून यामुळे नागरिक वैतागले आहेत. त्यात लांब पल्याच्या एसटी बसेस आणि अवजड वाहनाचा दुतर्फा सर्विस रोडचा वापर वाढला असल्याने, एकीकडे स्थानिक रहिवाशांना ये जा करण्यासाठी तयार करण्यात आलेला सर्विस रोडचा वापर मोठी वाहने करतात, त्यामुळे सतत छोटे मोठे अपघात होत असतात. 


गाव परिसरात मुख्य महामार्ग दुपदरी असल्याने बसचालक वेळ वाचवण्यासाठी विरुद्ध दिशेने सर्व्हिस रोडचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्या वाहनांना वेगही फार असतो. पोलिसांनी अनेक वेळा या ठिकाणी बँरीकेट ही लावली परंतु यालाही कोणी जुमानत नाही. प्रशासनाने या गोष्टीची दखल घेणे गरजेचे बनले आहे.